पुणे

बुलेटिन

CD
‘त्या‘ जागेवरील साहित्य हटवा! चिंबल ग्रामस्थांची सात दिवसांची सरकारला मुदत पणजी, ता. १६ (प्रतिनिधी) ः युनिटी मॉलसाठी जागा अधिग्रहीत करताना चिंबल पठारावर ‘तोय्यार तलावा‘च्या जवळील जमिनीवर खोदकाम केले होते. ती जमीन सात दिवसांच्या आत पूर्ववत न केल्यास नव्याने आंदोलनाचा छेडण्याचा इशारा आज चिंबलच्या ग्रामस्थांनी दिला. याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्याकडे सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर आज चिंबल ग्रामस्थांनी धडक दिली. गोविंद शिरोडकर, अजय खोलकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन निवदेन सादर केले. उपजिल्हाधिकारी परब यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्वीकारले. यावेळी खोलकर यांनी सांगितले की, ‘युनिटी मॉल''साठी सरकारने जागा अधिगृहती करण्याचा प्रयत्न केला, त्याठिकाणी लोखंडी पत्रा संरक्षक म्हणून उभारण्यात आला. त्या जागेच्या आत खोदकाम करण्यात आले आहे. येथे युनिटी मॉल उभारण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे, पण अजूनही तेथील पत्रे काढण्यात आले नाहीत की ती जागा पूर्ववत केली गेली नाही. त्यामुळे ही जागा पूर्ववत करावी, अशी आमची मागणी आहे. ‘तोय्यार'' तलावापासून काही अंतरावर ही जागा आहे. त्यामुळेच युनिटी मॉलला ग्रासस्थांनी विरोध केला होता. शिरोडकर म्हणाले, युनिटी मॉल रद्द झाला पण येथील साहित्य अजिबात उचलले नाही. त्याठिकाणी खड्डे करण्यात आले असून, तेही पूर्ववत केलेल नाहीत. पावसाळ्यात हे खड्डे धोकादायक ठरू शकतात. आम्ही सरकारला यापूर्वीच ही जागा पूर्ववत करण्याविषयी सूचित केले आहे. तरीही त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच आम्हाला हे पाऊल उचलावे लागले आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शिष्टमंडळाने सादर केलेले निवेदन उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांनी स्वीकारले. त्यावर परब म्हणाले, हे निवेदन आपण वरिष्ठांना दाखविले जाईल आणि पुढील कार्यवाही केली जाईल. सर्व नागरिकांनी येथून हटावे, अशी विनंती केली. याप्रसंगी प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT