पुणे

सेवानिवृत्त जवान मिरवणूक

CD

सेवानिवृत्त नायब सुभेदारांचे गोंदवलेत स्‍वागत

गोंदवले, ता. ८ : देशसेवेचा चार पिढ्यांचा वारसा असलेल्या गोंदवले बुद्रुकच्या पाटील कुटुंबातील पोपट रघुनाथ पाटील हे नुकतेच नायब सुभेदारपदावरून सेवानिवृत्त झाले. त्‍यानंतर त्‍यांचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्‍वागत केले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.            
येथील पोपट पाटील हे वीस वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. त्यांनी या काळात भारतीय सीमेवर देशरक्षणाच्या कामात मोठे योगदान देत नायब सुभेदारपदापर्यंत मजल मारली. सेवानिवृत्तीनंतर अप्पा महाराज समाधी चौकात महिलांनी औक्षण केले. उपस्थितांनीही फुलांची उधळण केली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात मुख्य चौकापासून समाधी मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्री ब्रह्मचैतन्‍य महाराज समाधीचे दर्शन घेतल्यानंतर ही मिरवणूक पुन्हा मुख्य चौकात आली. या ठिकाणी ग्रामस्थांनी पोपट कट्टे यांचा सत्कार केला. यावेळी ‘जवान जय जय किसान’च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.
-----------------------------
चार पिढ्यांचा देशसेवेचा वारसा
सेवानिवृत्त पोपट पाटील यांचे आजोबा (कै.) विष्णू गोपाळ पाटील त्यांनी मराठा इन्‍फंट्रीमध्‍ये हवालदार म्हणून काम केले. आजही ती परंपरा तितक्याच निष्‍ठेने पुढे सुरू आहे. पोपट यांचे चुलते गुरुनाथ पाटील हेही भारतीय सैन्य दलातून नायब सुभेदार पदावर पोहोचले आणि सेवानिवृत्त झाले, तर आशिष पाटील हे पोपट यांचे पुतणे आजही नाईकपदी सीमेवर देशसेवा करत आहेत.
-------------------------------
छायाचित्र :.........GON26B02641
गोंदवले बुद्रुक : पोपट पाटील यांची गावातून काढण्‍यात आलेली मिरवणूक. (फिरोज तांबोळी : सकाळ छायाचित्रसेवा)
....................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT