पुणे

इंदापूरसाठी पाणी सोडण्याचे लेखी पत्र

CD

कळस, ता. ८ : इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून गेली आहे. उन्हाच्या तीव्रतेने विहिरींच्या पाणी पातळीने तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. याशिवाय जनावरांच्या चारा- पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याबाबतीत पाटबंधारे विभागाच्या भूमिकेवर शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. अशात लाभक्षेत्रातील गावांगावातील शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेताच पाटबंधारे विभागाने मंगळवारी (ता. १२) पाणी सोडण्याचे लेखी पत्र शेतकऱ्यांना दिले आहे. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील अकोले, कळस, रुई, न्हावी यांसह अन्य गावांतील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून कालव्याला पाणी सोडण्याची मागणी करत आहेत. शेतातील उस, फळबागा, चारापिके व तरकारी पिकांचा पाण्याअभावी कोळसा होत असल्याने शेतकऱ्यांची पाण्यासाठी घालमेल सुरु आहे. पिकांसाठी मोठा खर्च करूनही ती हातची जात असल्याचे दुःख शेतकऱ्यांचे काळीज चिरत आहे. यामुळे समाजमाध्यमांवर संपर्क करत शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेऊन एकत्रित येत उन्हाळी आवर्तनाच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. ८) पुणे- सोलापूर महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांनी याबाबतचे निवेदन खडकवासला पाटबंधारे विभाग, भिगवण पोलिस व तहसीलदारांना दिले होते. यावर भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विनोद महांगडे यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून आंदोलकांना ठोस आश्वासन देण्याची विनंती केली. यानंतर पाटबंधारे विभागाने शेवटच्या क्षणी लेखी पत्र देत आंदोलन स्थगित करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडले.
मात्र ‘पाणी सोडणार’ या आश्वासनापलीकडे प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत कोणतीही ठोस हमी न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. १२ तारखेला सोडण्यात येणारे पाणी इंदापुरात कधी येईल व शेतकऱ्यांना ते मिळेल काय, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांची पिके जळून गेल्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ या उक्तीप्रमाणे असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेली पिकांची लागवड पाण्याअभावी धोक्यात आली असल्याने आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे.
दरम्यान, आंदोलन स्थगित झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. फक्त पत्र देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार पाटबंधारे विभागाने केला आहे. प्रत्यक्ष पाणी शेतात येईपर्यंत प्रशासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

१२ मेपासून आवर्तन
याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख म्हणाले, ‘‘१२ मेपासून इंदापूर तालुक्याला उन्हाळी आवर्तन सुरु करण्याचे नियोजन सुरु आहे. याबाबतचे लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT