पुणे

पोलिसांना धक्काबुक्की करुन संशयित आरोपीस पळुन जाण्यास मदत.. कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

CD

पोलिसांना धक्काबुक्की करून
संशयितास पळून जाण्यास मदत

कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा

कुर्डुवाडी, ता. १० : बडनेरा येथील रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित पोपट गुंजाळ याला गावी बारलोणी (ता. माढा) येथे पकडण्यासाठी गेलेल्या कुर्डुवाडी पोलिसांना ८-९ जणांनी धक्काबुक्की करत संशयित आरोपीस पळून जाण्यास मदत केली. ही घटना बुधवारी (ता. ६) संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास बारलोणी येथे घडली.
सहायक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार मागील वर्षी बडनेरा येथील रेल्वे पोलिसांमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी संशयित आरोपी पोपट गुंजाळ हा त्याच्या घरी आल्याचे पोलिसांना समजले. बुधवारी करमाळा येथून उपविभागीय बैठकीवरून परत येत असताना सायंकाळी कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे व पोलिस पथक त्याच्या घराजवळ पोचले. गुंजाळ याला सचिन शिंदे यांनी व इतर पोलिसांनी पकडले असता गणेश गुंजाळ, महेश गुंजाळ, पोपट गुंजाळ, पोपट गुंजाळ यांची पत्नी व अनोळखी चार- पाच महिला या सर्वांनी सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांना धक्काबुक्की करत पोपट गुंजाळ याला पळून जाण्यास मदत केली. सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे यांना धमकी देत नेमप्लेट तोडली व त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT