पुणे

केळघर विधायक बातमी

CD

जिद्दीच्या जोरावर उपनिरीक्षक पदाला गवसणी

केडंबेच्या अजय सुतार याची यशोगाथा; आर्थिक परिस्थितीवर मात करत मिळवले यश

संदीप गाडवे : सकाळ वृत्तसेवा
केळघर, ता. ८ : जावळी तालुक्यातील केडंबे येथील अजय नामदेव सुतार या युवकाने पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीवर मात करून स्पर्धा परीक्षेत मिळवलेले हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत अजय सुतार याची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. हवालदार ते पोलिस उपनिरीक्षक या प्रवासात अनेक चढ- उतारांचा सामना करत अजय सुतार याने हे यश मिळवले. अजयचे प्राथमिक शिक्षण हे केडंबे (ता. जावळी) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण श्री भैरवनाथ विद्यालय, केळघर येथे झाले असून, पुढील शिक्षण त्याने यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे प्रवेश घेतला. मात्र, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षणात खंड पडला. अशा परिस्थितीत १२ वी कॉमर्सचे शिक्षण मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत पूर्ण केले. तेथील शिक्षक आणि मित्रांची त्याला साथ मिळाली. पुढे अजयने पोलिस भरतीचा निर्णय घेतला. त्यासाठी मेढा येथील जावळी करिअर ॲकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. तिथेही फी भरण्यासाठी पैसे नसल्याने अजयने ॲकॅडमीचे संतोष कदम यांना संधी दिली, तर आपल्या ॲकॅडमीमध्ये आणि वेण्णा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतो, असे सांगितले. त्यामुळे ॲकॅडमीच्या फीचा प्रश्न मिटला. पुढील पदवीचे शिक्षण गिरिस्थान प्रशाला महाबळेश्वर येथे इतिहास विषयातून घेतले.
मुंबई पोलिस दलात पहिल्याच प्रयत्नात अजय भरती झाला. १० महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तो पोलिस कॉन्स्टेबल पदावर रुजू झाला; पण त्याला अधिकारी व्हायचे स्वप्न थांबू देत नव्हते. त्याने पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. अखेर त्याने यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
---------------------------
कोट

आज जो सुवर्ण दिवस मी पाहतोय, तो माझे आई-वडील, कुटुंबीय, मित्र, शिक्षक व पोलिस खात्यातील अधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्यामुळेच, त्यांचे हे ऋण आयुष्यभर विसरणार नाही. आयुष्यात खूप अडचणी येतात; पण त्या नवीन संधीही घेऊन येतात. त्याचे संधीचे सोने करणे आपल्या हातात असते.

- अजय सुतार.
-----------------------------
01516
-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT