एज्युस्मार्ट ॲबॅकस सेंटरच्या
विद्यार्थ्यांचे नॅशनल स्पर्धेत यश
केळघर, ता. ११ : ठाणे येथे झालेल्या १८ व्या नॅशनल ॲबॅकस स्पर्धेत साताऱ्यातील शाहूपुरीतील एज्युस्मार्ट अबॅकस सेंटरच्या रेखा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
स्पर्धेत भारतातून प्रियल शिंदे हिने इ वन कॅटेगरीतून प्रथम, स्वराली इथापे हिने एफ फाय कॅटेगरीतून द्वितीय क्रमांक मिळविला. समर्थ शेडगे याने इ फाय कॅटेगरीतून चौथा व आयुष वाघमारे याने झेड थ्री कॅटेगरीतून चौथा क्रमांक मिळविला.
इंटरनॅशनल ग्रेडिंग एक्झाममध्ये १०० पैकी १०० गुण मिळविल्याने या चारही विद्यार्थ्यांची सिंगापूर येथे होणाऱ्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक्स अँड मेंटल अर्थ मॅटिक या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
समृद्धी शिंदे व वीर मोरे यांनी सातारा विभागातून केंद्रस्तरावर यश मिळविले. वेद गिरी, ज्ञानेश शिंदे, शिवप्रसाद चवरे, पृथ्वीराज पाटील, समृद्धी केमदारने, हर्षवर्धन शिंदे व अक्षता चवरे यांनी इंटरनॅशनल ग्रेडिंग एक्झाममध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले. विद्यार्थ्यांना एज्युस्मार्ट शाहूपुरी सेंटरच्या संचालिका रेखा पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
-----------------------
01519
सातारा : ॲबॅकस स्पर्धेत यश मिळवणारे एजुमार्ट सेंटरचे विद्यार्थी.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.