पुणे

खंडाळा - गडकरी साहेब - इकडे ही लक्ष द्या : तालुक्यातील प्रश्न उद्भवणारे पण ते सोडवले जात नाहीत

CD

खंडाळ्याचे प्रश्न सुटणार कधी?

शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला नाही; रस्ते सुरक्षा वाऱ्यावर

खंडाळा, ता. ८ : खंडाळा तालुक्यातील स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या नशिबी गेल्या १५-२० वर्षांपासून केवळ आश्वासनांचा पाऊसच आला आहे. उद्या केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी शिरवळ आणि भुईंज दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘साहेब, इकडेही लक्ष द्या,’ अशी हाक खंडाळावासीय देत आहेत.
महामार्गाच्या रुंदीकरणासाठी येथील २४ शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या. मात्र, आज तब्बल १७ वर्षे उलटूनही या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळालेला नाही. शेतकरी आजही शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. हीच अवस्था ट्रॉमा केअर सेंटरसाठी जमिनी देणाऱ्या १४ शेतकऱ्यांची आहे. विकासाच्या नावाखाली जमिनी देऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याच्या कामातही प्रचंड सावळागोंधळ सुरू असल्याचे चित्र आहे. एका बाजूची वाहतूक सुरू झाली असली, तरी दुसऱ्या बोगद्याचे काम, उड्डाणपूल आणि जोडरस्ते अद्याप अपूर्ण आहेत. २०१३ मध्ये मंजूर झालेले ट्रॉमा केअर सेंटर आजही रेंगाळलेलेच आहे. घाटातील अपघातात जखमींना तातडीने उपचार मिळत नसल्याने अनेकांनी प्राण गमावले आहेत. मात्र, शासन दरबारी याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. पारगाव आणि शिरवळ येथील उड्डाणपुलांचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. औद्योगिकीकरणामुळे वाढलेली कंटेनर वाहतूक आणि जुन्या भरावाच्या पुलांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आधुनिक उड्डाणपुलांची नितांत गरज आहे. वेळे येथील अंडर बायपासचे कामही संथगतीने सुरू आहे. महामार्गावर सीसीटीव्ही, स्पीड कंट्रोल यंत्रणा आणि आपत्कालीन वैद्यकीय सोयींचा अभाव असल्याने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. मंत्री गडकरी यांनी खंडाळ्याच्या या रखडलेल्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

खंडाळा ः उड्डाणपुलाचे सुरू असलेले काम. (अशपाक पटेल : सकाळ छायाचित्रसेवा)
...................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT