वडूजमध्ये पारितोषिक वितरण उत्साहात
कलेढोण, ता. २७ : मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संलग्नित उत्कर्ष उच्च शिक्षण मंडळ वडूजच्या अध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य शोभना गुदगे यांच्या हस्ते वडूज येथील नूतन प्राथमिक शाळेत विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
या वेळी विजय खटावकर, डॉ. बी. जे. काटकर, स्वप्नाली गोडसे, दिगंबर पिटके, प्रशांत सनगर, मायणीचे उपसरपंच डी. एस. कचरे, प्रसाद चिंचकर, मुख्याध्यापिका संगीता कणसे, राधिका गोडसे, स्वप्नाली गोडसे, आरती काळे, शशिकांत पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शोभना गुदगे म्हणाल्या, ‘‘सर्व पालकांनी नूतन प्राथमिक शाळेवरती ठेवलेला विश्वास वृद्धिंगत करून या पुढच्या काळात इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग नूतन प्राथमिक शाळेमध्ये सुरू केले जातील. तसेच सध्या सुरू असलेल्या इमारतीच्या वाढीव बांधकामामुळे सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा पद्धतीची व व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य देणारी शाळा बनवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाईल. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेतील तज्ज्ञ शिक्षकांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना करून देण्यात येईल व ही शाखा शैक्षणिक गुणवत्तेत प्रगतिपथावर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.’’
00494
वडूज : उत्कर्ष शिक्षण मंडळाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी शुभना गुदगे व मान्यवर.
(अंकुश चव्हाण : सकाळ छायाचित्रसेवा)