पुणे

मलकापूर शिक्षण संस्था चालकाचे अधिवेशन

CD

शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू

आमदार आसगावकर; शिक्षण संस्था संघाच्या अधिवेशनात इशारा

मलकापूर, ता. १० : देशातील अनेक राज्ये शिक्षणामध्ये प्रगतिपथावर असून, महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात मागे पडत आहे. याला महाराष्ट्रातील शिक्षण खाते जबाबदार आहे. विद्यार्थी व शिक्षक हितासाठी शिक्षण संस्थांबरोबर येत्या १५ दिवसांत शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी दिला.

जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या अधिवेशनात ते बोलत होतेे. अशोकराव थोरात अध्यक्षस्थानी होते. रवींद्र फडणवीस, आप्पासाहेब बालवडकर, माजी आमदार विजय गव्हाणे, रावसाहेब पाटील, शिक्षणतज्ज्ञ श्री. साळुंखे, सचिन नलावडे, चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

आमदार आसगावकर म्हणाले, ‘‘विद्यार्थी- पालक यांचे शैक्षणिक हित महाराष्ट्र शासनाकडून जोपासले जात नाही. मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद, शासकीय व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळा बंद करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. महाराष्ट्रातील मोठमोठ्या शिक्षण संस्थांच्या ग्रामीण व निमशहरी भागातील अनेक मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. नवीन स्वयंअर्थसहाय्यित शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा बृहत आराखड्याशिवाय दिल्या जात आहेत. या शाळांना अनुदानित शाळेप्रमाणे कुठल्याही इमारत, खेळाचे मैदान, स्वच्छतागृहे अशासारख्या अट लावत नाहीत. त्यामुळे स्वयंअर्थसहाय्यित शाळा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा मागेल त्याला मागेल तेथे शासकीय अधिकारी अटींचे पालन न करता मंजुरी देत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या, शासकीय व अनुदानित शाळा, विद्यालये बंद पडत आहेत. याचा ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवरील मराठी माध्यमाच्या शाळांना फटका बसत आहे. महापालिका क्षेत्रातील मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. त्याठिकाणी हॉटेल्स, मॉल किंवा इंग्रजी शाळा निघत आहेत.
किसनराव जाधव यांनी स्वागत केले. डी. के. जाधव यांनी प्रास्ताविक केले.
.......
A01517
मलकापूर : अधिवेशनात बोलताना जयंत आसगावकर. त्या वेळी अशोकराव थोरात, रवींद्र फडणवीस, आप्पासाहेब बालवडकर, विजय गव्हाणे आदी.
...................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT