पुणे

करमाळा वारसा पुरवणीसाठी आण्णा काळे, करमाळा

CD

उजनी धरण, केळी आणि कमलाभवानी मंदिर छायाचित्र

त्यागाचा वारसा असलेला करमाळा तालुका

करमाळा शहराची आज सोलापूर जिल्ह्यात वेगळी ओळख दिसून येते, ती केवळ करमाळा तालुक्याने आजपर्यंत विविध क्षेत्रात दिलेल्या वारशामुळे आणि तोच वारसा पुढे चालवणारी ही पिढी आहे. यामुळेच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात याच्यासह सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. उजनी धरणाच्या पाण्यामुळे जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाला आहे. त्या उजनी धरणात करमाळा तालुक्यातील ३३ गावे विस्थापित झाली. एवढ्या मोठ्या त्यागातून हे धरण निर्माण झाले. करमाळा तालुक्याला त्यागाचा मोठा वारसा असल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.
- अण्णा काळे, करमाळा

करमाळा तालुका तसा पुणे, अहिल्यानगर, धाराशिव या तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेला तालुका आहे. जिल्हा मुख्यालयापासून सर्वात जास्त अंतरावरील करमाळा तालुका असला तरी या करमाळा तालुक्याने सोलापूर जिल्ह्याच्या जडणघडणीत भरीव असा वाटा उचलला आहे. सर्व क्षेत्रात करमाळा तालुक्याने भरीव कामगिरी करून दाखविली आहे. त्याचाच वारसा घेऊन नवी पिढीही काम करताना दिसून येते.
सोलापूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान करमाळा तालुक्याचे माजी आमदार देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांना मिळाला होता. कै. नामदेवराव जगताप यांचा वारसा घेऊन त्यांचे चिरंजीव माजी आमदार जयवंतराव जगताप राजकारणात आले. वास्तविक पाहता आज करमाळा तालुक्याच्या राजकारणात जे म्हणून सत्तेवर आले, जे कोणी राजकारण करत आहेत. त्या प्रत्येकांना कळत नकळत जगताप यांचाच वारसा लाभला असल्याचे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. हाच राजकीय वारसा पुढे घेऊन करमाळा तालुक्याची वाटचाल होताना दिसत आहे. याच करमाळा तालुक्याने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सर्वप्रथम प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. कै. दिगंबरराव बागल यांना राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. १९५२ पासून कै. नामदेवराव जगताप, सुशीलकुमार शिंदे, कै. अण्णासाहेब जगताप, कै. के. जी. कांबळे, कै. टी. एच. सोनवणे, कै. रावसाहेब पाटील, जयवंतराव जगताप, कै. दिगंबरराव बागल, श्‍यामलताई बागल, संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांनी या तालुक्याचे आमदार म्हणून काम पाहिले आहे. आदिनाथ कारखाना उभा करण्यासाठी २३ वर्ष अनवाणी चालणारे कर्मयोगी कै. गोविंदबापू पाटील यांचे चिरंजीव लालमतीशी इमान ठेवून वागणारे आमदार नारायण पाटील हे तालुक्याचे आमदार म्हणून काम करत आहेत. आमदार पाटील यांची ही दुसरी टर्म असून ते महाराष्ट्रातील नावाजलेले पैलवान आहेत. त्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर कुस्ती क्षेत्रात सुवर्णपदक मिळवले आहे. करमाळा तालुक्याला कुस्तीचा मोठा वारसा लाभला असून महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, महाराष्ट्र केसरी बालारफी शेख, डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील, उपमहाराष्ट्र केसरी विकी जाधव यांच्यासह महिला कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारी आश्लेषा बागडे हिने आपले नाव कुस्ती क्षेत्रात गाजवले आहे.
चित्रपटसृष्टीत जगात नाव कोरलेले नागराज मंजुळे याच तालुक्यातील आहेत. नागराज मंजुळेसारखा अतिशय हलाखीच्या परिस्थितीत वाढलेला मुलगा एवढा मोठा दिग्दर्शक होऊ शकतो, या प्रेरणेने आणि हा वारसा घेऊन तालुक्यातील अनेकांनी चित्रपट क्षेत्रात काम करायला सुरवात केली आहे. साडे येथील चित्रपट सृष्टीत पदार्पण केलेले दिग्दर्शक मंगेश बदर यांचेही नाव चित्रपटसृष्टीत पुढे येत आहे. राज्यातील महत्त्वाचे देवस्थान असलेले श्री कमलाभवानी देवीचे मंदिर करमाळा तालुक्यात आहे. हे मंदिर प्रचीन असून या परिसराचा विकास झाल्यास धार्मिक पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत.
जिल्ह्याचे वैभव आणि अर्थव्यवस्थेचा कणा असलेले उजनी धरण व कोळगाव धरण स्व. नामदेवराव जगताप यांच्या प्रयत्नाने झाले. उजनी धरणामुळे तालुक्यातील शेतीला पाणी उपलब्ध झाले आहे. उजनी धरणावरून दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू झाली आहे. याचा फायदा करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच उजनी धरणावरून रिटेवाडी उपसा सिंचन योजना झाली पाहिजे, ही संकल्पना सर्वप्रथम आमदार नारायण पाटील यांनी मांडली. ही योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न सुरू केले आहेत. भविष्यात ही योजना व्हावी, अशी अपेक्षा आहे. एका बाजूला तालुक्याला प्रचंड त्यागाचा वारसा लाभलेला असताना दुसरीकडे मात्र करमाळा तालुक्यात शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांचा प्रचंड अभाव आहे. आजही सर्व सुविधांनी युक्त
असे एकही हॉस्पिटल करमाळा तालुक्यात होऊ शकले नाही. शैक्षणिकदृष्ट्या देखील करमाळा तालुका मागास असून अद्यापही मोठे शैक्षणिक संकुल करमाळा तालुक्यात उभा राहू शकले नाही येणाऱ्या पिढीकडून करमाळा शहरात किंवा तालुक्यात मोठे शैक्षणिक संकुल वेगळे झाले पाहिजे, अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
करमाळा तालुक्याचे अर्थव्यवस्था येथील शेतीवर आधारित आहे. तालुक्यात कोणताही मोठा व्यवसाय नाही. उजनी धरणामुळे तालुक्यातील सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर ती वाढली आहे. हजारो हेक्टर उसाची लागवड तालुक्यात होते. दरवर्षी साधारणपणे ४० ते ४५ लाख मेट्रिक टन ऊस तालुक्यातील उत्पादित होतो. करमाळा तालुक्यात चार साखर कारखाने असूनही आज दोन कारखाने बंद तर दोन सुरू आहेत. गेल्या वर्षी चारही कारखाने बंद होते. एका बाजूला तालुक्यात हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त ऊस असताना तालुक्यातील कारखानदारी अडचणीत का असा प्रश्‍न निर्माण होत आहे. श्री आजिनाथ सहकारी साखर कारखाना प्रचंड त्यागातून उभा राहिलेला आहे. आज हा साखर कारखाना अडचणीत आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांचा पॅनेल विजय झाला असून आमदार पाटील या कारखान्याचे चेअरमन आहेत. हा कारखाना सुरू व्हावा, यासाठी ते शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मकाई सहकारी साखर कारखाना देखील गेली तीन वर्षापासून बंद आहे. त्याचबरोबर तालुक्यात असलेल्या दोन खासगी कारखान्यांपैकी एक कारखाना माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचा आहे तर दुसरा कारखाना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा आहे. सध्या सावंत कुटुंबात वाटाघाटी झाल्याने विहाळ येथील भैरवनाथ शुगर हा साखर कारखाना शिवनेरी शुगर म्हणून चालवला जात आहे. करमाळा शहरात चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात, शहरात स्वच्छता चांगली असावी, योग्य पद्धतीने पाणीपुरवठा व्हावा, मोकाट जनावरांची व्यवस्था करावी, रस्ते सुधारले पाहिजेत, जागोजागी स्वच्छतागृह असावीत, अशा अनेक अपेक्षा ठेवून शहरवासीय वर्षानुवर्षे आहेत.

चौकट...
ध्यास घेऊन कार्यरत राहण्याची गरज
करमाळा तालुका आणि शहर याचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. फक्त कमतरता आहे, ती ध्यास घेऊन काम करण्याची. भविष्यात जो कोणी ध्यास घेऊन करमाळा तालुक्याचा विकास करेल त्याला हा करमाळा तालुका भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. कवी सुरेश शिंदे, प्रसिद्ध लेखक कवी डॉ. प्रदीप आवटे, कवी राजेंद्र दास यांचा साहित्य क्षेत्राचा वारसा चालवणारी नवीन कवी व लेखकांची पिढी आज आपल्याला पाहायला मिळते. महात्मा फुले समाज सेवा मंडळाच्या मार्फत प्रमोद झिंजाडे यांनी देश पातळीवर आपले सामाजिक कार्य पोचवले आहे. अलीकडच्या काळात गणेश करे- पाटील यांनी स्थापन केलेल्या यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने करमाळा तालुक्यात सामाजिक काम केले जात आहे. या तालुक्याला प्रचंड त्यागाचा आणि बलिदानाचा वारसा लाभला आहे. हा वारसा खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचे काम एक ठराविक वर्ग या ठिकाणी करत आहे. मात्र, हा तालुका खऱ्या अर्थाने विकसित करण्यासाठी एक ध्यास घेऊन काम करण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Crime : किरकोळ वादातून डोकं दगडानं ठेचलं, बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात १७ वर्षीय तरुणाची हत्या; २ अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

UGC NET 2025 अ‍ॅडमिट कार्ड जाहीर; 31 डिसेंबरच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट 'असे' करा डाऊनलोड!

SA20: बापरे... क्रिकेट चाहत्याने पकडला तब्बल १.०८ कोटींचा कॅच! T20 सामन्यातील Video होतोय व्हायरल

सोलापूरमध्ये मोठा ट्विस्ट! काँग्रेसने तिकीट दिल्यानंतर महिला उमेदवारांचा MIM मध्ये प्रवेश, काय दिलं कारण?

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या सुनेला अटक, दीड कोटीची खंडणी घेताना रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT