पुणे

श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी विवाहबंधनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती

CD

KOR26B10765
करमाळा ः श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यातील वर-वधू.

श्रीराम प्रतिष्ठानच्या सोहळ्यात २५ जोडपी विवाहबद्ध
करमाळा, ता. ११ : येथील श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी विवाहबंधनात अडकली. हजारोंच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात हा विवाह सोहळा पार पडला.

या सोहळ्यास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार नारायण पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजाभाऊ राऊत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, जिल्हा परिषद सदस्या रश्मी बागल, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, श्रीराम प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यांमुळे विवाहासाठी होणारा अनावश्यक खर्च टाळता येतो आणि समाजात सकारात्मक संदेश जातो.
पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT