करहरमध्ये हिसकावलेले दागिने हस्तगत
मेढा पोलिसांची कारवाई; भाच्याला अटक
कास, ता. ८ ः आत्याचे दागिने हिसकावून पसार झालेल्या भाच्याला मेढा पोलिसांनी तत्काळ अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी संशयितास न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
करहर (ता. जावळी) येथील रोहिणी बबन दुधाणे या २९ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास किचनमध्ये भांडी घासत उभ्या असताना त्यांचा भाचा संशयित अजिंक्य सुरेश पांचाळ (वय २७, मूळ रा. करहर, सध्या रा. पाचगणी) याने पाठीमागून येऊन रोहिणी दुधाणे यांना धक्का देऊन दुखापत करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व डोरले हिसकावून नेले होते. याबाबत मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होतच संशयित अजिंक्य पांचाळ यास तत्काळ अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले असून, तपास उपनिरीक्षक व्ही. वाय. गंगावणे करीत आहेत.
कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, पोलिस उपनिरीक्षक व्ही. वाय. गंगावणे, हवालदार अनिल सावंत, विजय माळी, श्री. माने, धीरज बेसके, सनी काळे, अनिकेत दीक्षित यांनी सहभाग घेतला.
-------------------------------
04943
मेढा : ताब्यात घेतलेल्या संशयितासमवेत पोलिस अधिकारी, कर्मचारी.
-------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.