पुणे

पांढरेवाडी शाळेच्या मुलांचे क्रीडा स्पर्धांत घवघवीत यश

CD

कुरकुंभ, ता. २८ : माळवाडी (ता. दौंड) येथे पुणे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत दौंड तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धा कै. भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालयात उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांढरेवाडी यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
वैयक्तिक स्पर्धेत अक्षरा विलास जगताप हिने बेडूक उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. संघ स्पर्धांमध्ये लहान गटातील मुलांच्या खो-खो स्पर्धेत पांढरेवाडी शाळेच्या संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले असून जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे.
याशिवाय, ५ वी ते ७ वी गटातील मुलींच्या लंगडी स्पर्धेत शाळेने उपविजेतेपद मिळविले, तर ५ वी ते ८ वी गटातील मुलांच्या खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
या यशस्वी खेळाडूंना शाळेतील शिक्षक अविनाश अडसूळ, छाया साळवे-पगारे, उज्ज्वला जगताप, ऊर्मिला गुजर, महेंद्र भोसले तसेच मुख्याध्यापक नवनाथ बोंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'38 मध्ये नवऱ्याची भेट, 39 मध्ये लग्न आणि..' जुई गडकरीला कसं हवय वैवाहिक आयुष्य? पोस्ट शेअर करत म्हणाली...

Provident Fund: तुम्ही सॅलरी अकाउंट बदललं? ‘हे’ काम नाही केलं तर PF चे पैसे अडकू शकतात!

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटने एआय जगातील हुशार लोकांना एकत्र आणले- पंतप्रधान मोदी

Narhari Zirwal clerk action : नरहरी झिरवळ यांच्या खात्यातील लिपिकावर कारवाई; चौकशी अहवाल येईपर्यंत खाजगी सचिवांचा कार्यभार थांबवला

Deputy CM Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात; अध्यक्ष निवडीचा पेच कायम, जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय

SCROLL FOR NEXT