पुणे

डंपरला धडक बसल्याने दुचाकीस्वार तरुण मृत्यूमुखी

CD

लोहगाव, ता. १७ : येथील डी. वाय. पाटील रस्त्यावर डंपरला धडक बसल्याने २२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (ता. १६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. स्वप्नील प्रकाश साळवे (वय २२) असे मृताचे नाव आहे.
याबाबत विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील डुडूळगावमधील महाविद्यालयात तास संपवून दुचाकीवरून केसनंदकडे जात होता. त्यावेळी समोरून येणारा डंपरला तो धडकला. मागील चाकाखाली सापडल्याने तो मृत्यूमुखी पडला. विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी डंपरचालक व्यंकट गुरप्पा पवार (रा. निरगुडी रस्ता, लोहगाव) याला ताब्यात घेतले आहे.
स्वप्नील मुळचा यवतचा (ता. दौंड) रहिवासी आहे. तो बी. फार्मचे शिक्षण घेत होता. केसनंदमध्ये तो मित्रांसोबत राहत होता. तो एका मेडीकल दुकानात कामही करायचा. त्याच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ आहे.
---
डी. वाय. पाटील रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे तेथे अपघातांचे प्रमाण जास्त आहे. याबाबत पुणे महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही काही फरक पडत नाही. रस्त्याचे काम लवकरच करू असे सांगून अधिकारी चालढकल करतात.
- शंकर किरडे, नागरिक
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

SCROLL FOR NEXT