पुणे

नववर्ष स्वागतासाठी सजली पर्यटननगरी

CD

लोणावळा, ता. २६ : सध्या नाताळच्या सुट्या सुरू आहेत. त्यामुळे पर्यटननगरी लोणावळा-खंडाळ्यात वर्दळ वाढली आहे. तसेच ‘थर्टी फर्स्ट’ अर्थात सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागतासाठी येथे पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे हॉटेल, रिसॉर्टच्या बुकिंगला पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. अनेक ‘सेकंड होम’ हाउसफुल्ल झाली आहेत.
लोणावळ्याचे अर्थकारण प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे. नूतन वर्षानिमित्त मौजमजा, तसेच येथील प्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी लोणावळ्यात पुणे, मुंबईसह परराज्यांतून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या दरम्यान ‘सेकंड होम’बरोबरच बहुतांशी हॉटेल तसेच खासगी बंगल्यांमध्ये त्यांचे वास्तव्य असते. पवनमावळ, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, कोराईगडसह लोणावळ्यातील विशेषतः लायन्स पॉइंट, खंडाळा येथील ‘सनसेट पॉइंट’ येथे पर्यटकांसह हौशी ट्रेकरची पसंती असते. त्यामुळे या परिसरांतील बंगल्यांनाही मागणी वाढली आहे.

‘एमटीडीसी’ रिसॉर्ट ‘फुल्ल’
‘‘नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कार्ला येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टचे बुकिंग एक जानेवारीपर्यंत पूर्ण झाले आहे,’’ अशी माहिती व्यवस्थापक साहिल भालेराव यांनी दिली. पर्यटकांसाठी गझल, लाइव्ह ऑर्केस्ट्रा, कॅम्प फायर, जादूचे प्रयोग, मुलांसाठी खेळ आदी उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

पोलिसांच्या सूचना
पोलिस पाटील, कृषी पर्यटन केंद्र, बंगलेधारक, कॅम्पिंग चालक यांना सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. प्रामुख्याने ‘‘लोणावळा शहर, ग्रामीण हद्दीतील हॉटेलचालक-मालक, टेंट व्यावसायिक, खासगी बंगलेधारकांनी नववर्ष पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी. पर्यटकांची नोंद ठेवावी, नियमांचे पालन करावे,’’ आदी सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

वाहतूक व्यवस्थेत बदल
नववर्ष स्वागत, सुट्ट्या व सप्ताहअखेरमुळे पवना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने ३०-३१ डिसेंबर ते एक जानेवारी २०२६ या कालावधीत पुणे, मुंबई, कामशेतकडून येणाऱ्या वाहनांना पवनानगर बाजारपेठेत येण्यास बंदी करण्यात आली आहे.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
- येळसे ग्रामपंचायत फाटा येथून डावीकडे शिवली (विजय आडकर यांचे घरापासून उजवीकडे कोथुर्णे बाजुकडे)
- कोथुर्णे गाव येथून डावीकडे कोथुर्णे / मळवंडी फाट्यापासून उजवीकडे ब्राह्मणोलीकडे वारू फाट्यावरून पुढे सरळ
- ब्राह्मणोली फाटामार्गे जवण रस्ता मार्गे गणे, ठाकुरसाई, खडक गेव्हंडे, जवण, चावसर, मोरवे, तुंग या मार्गाने जावे
- पवनानगर, कालेगाव, आंबेगाव, शिंदगाव, पाले, धामनधरा, दुधिवरेकडे जाणारी वाहने तसेच जड / अवजड वाहनांना सोडण्यात येणार

खासगी बंगले, रिसोर्ट, हॉटेल, टेंट, कॅम्पिंग चालक मालकांनी नियमानुसार आवश्यक परवानग्या घेऊन व्यवसाय करावा. नववर्षाचे स्वागत करताना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.
- दिनेश तायडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण

नववर्ष पार्श्वभूमीवर लोणावळा खंडाळ्यातील हॉटेल व रिसॉर्टचे बुकिंग सरासरी टक्क्यांच्या आसपास झाले आहेत. होम स्टे, खासगी बंगले व टेन्ट हाउसना पसंती मिळत असून, बुकिंग पूर्ण होण्याची आशा व्यावसायिक बाळगून आहेत.
- अल अजहर कॉन्ट्रॅक्टर, अध्यक्ष, लोणावळा हॉटेल्स असोसिएशन

PNE25V79996

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Natural Gas: स्वच्छ इंधनाच्या दिशेने मोठे पाऊल! घरगुती गॅस स्वस्त होणार; देशभरात गॅस पाइपलाइन नेटवर्कचा झपाट्याने विस्तार

Kannad Election Deposit : कन्नड नगरपरिषद निवडणूक; ३० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; नगराध्यक्षासह अपक्षाचा फटका!

Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी ३०० लोकल रद्द; १८ जानेवारीपर्यंतचा ब्लॉक कसा असेल?

Wai Crime : वृद्ध महिलेला मारहाण करून दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; वाई‑पसरणी परिसरात खळबळ!

Mohol News : मोहोळ परिसरात होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण; वाहन चालवणाऱ्याची बेदरकारी की पालकांचं दुर्लक्ष!

SCROLL FOR NEXT