पुणे

जिल्ह्यातील होर्डिंगच्या तपासणीचा आदेश

CD

मंचर, ता. १५ : पुणे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भाग व महामार्गावर लावलेल्या होर्डिंगच्या रचनात्मक (structural audit) तपासणीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मंगळवारी दिला आहे. तसेच तपासणीअंती बेकायदा जाहिरात फलक आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे सूचित केले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती कदम, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी नगरपरिषद व नगरपंचायतींना दिवसे यांनी हा आदेश दिला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोसाट्याचा वारा अन् पावसाची शक्यता विचारात घेऊन मालमत्ता आणि वाहतुकीस अडथळा होऊ नये, यासाठी परवानगी दिलेल्या सर्व होर्डिंगचे पुन्हा नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास संबंधितांना कळवून त्याप्रमाणे ऑडिट केल्याचा दाखला १५ दिवसांत सादर करण्याबाबत सूचित करावे. आपल्या हद्दीतील स्ट्रक्चरल ऑडिट न केलेले सर्व होर्डिंग बेकायदा समजून अधिकाऱ्यांनी संबंधित होर्डिंगधारकास नोटीस देऊन तत्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करावी. तसेच सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

काय आहे आदेशात?
- वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या धोकादायक होर्डिंगवर तातडीने कारवाई करावी.
- संबंधित कामकाजावर दैनंदिन नियंत्रण ठेवावे.
- नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचा प्रमाणित दाखला सादर न केल्यास अथवा यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट न केलेल्या होर्डिंगधारकांना दिलेल्या नोटिसा व त्यांच्यावर प्रत्यक्ष केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा.
- दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून नैसर्गिक आपत्तीवेळी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला नागरिकांनी उभे राहू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT