पुणे

डॉ. कोल्हे

CD

‘भावी आमदार निकम’ म्हटल्याने
कोल्हे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी
मंचर, ता. ११ : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मंचर (ता.आंबेगाव) येथील नागरी सत्कार सभेत महाविकास आघाडीतील वाद उफाळून आला. डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांचा ‘भावी आमदार’ असा उल्लेख करताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठ सोडून खाली येत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे डॉ. कोल्हे यांना भाषण आटोपते घ्यावे लागले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर व शिवसेनेचे संघटक राजाराम बाणखेले यांनी शिरूर लोकसभेच्या सहापैकी किमान दोन जागा मिळाव्यात. त्यात आंबेगावचा समावेश असावा, अशी जाहीर मागणी केली. त्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी २०१९ च्या व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत निकम यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याचा व त्यांचे संघटन कौशल्य उत्तम असल्याचा उल्लेख केला. त्यानंतर गोंधळ झाला.
---
अजान चालू होती. त्यामुळे मी थोडा वेळ थांबलो. पुन्हा बोलायला लागलो. त्यात अनवधानाने मी भावी आमदार निकम असे म्हणालो. माझे जर चुकले असेल तर मी माफी मागतो. गैरसमज करून घेऊ नका. महाविकास आघाडी निर्णय घेईल त्याप्रमाणेच उमेदवार जाहीर केला जाईल. त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मी जिवाचे रान करेन. महाविकास आघाडी एकसंध ठेवावी.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार
---
मी जिल्हाप्रमुख आहे. माझ्यासह ठाकरे शिवसेना पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केले. प्रचारादरम्यान आमच्या कार्यकर्त्यांचा अनेकदा अपमान करण्यात आला. मतमोजणीला डॉ. कोल्हे यांचा पास देण्याऐवजी मला एका अपक्ष उमेदवाराचा पास दिला गेला. तो माझ्या पदाचा अवमान होता. त्यामुळे मी मतमोजणीला थांबलो नाही. माझ्याविषयी बदनामी करण्याचा प्रयत्न देवदत्त निकम यांनी केला. सतत आमचा अपमान केला जातो. आम्ही हे यापुढे सहन करणार नाही.
- सुरेश भोर, जिल्हाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Gold Smuggling Sangli Man Arrested : आसाममध्ये सोने तस्करी करणारा संशयित दिघंचीचा? सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई, 55 कोटींची सोन्याची बिस्किटे जप्त

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

SCROLL FOR NEXT