पुणे

एक फोन आला अन् जीव भांड्यात पडला…

CD

मंचर, ता. ६ ः अवसरी खुर्द येथील २४ यात्रेकरूंशी मंगळवारपासून संपर्क तुटला होता. गावात चिंतेचे वातावरण होते. नातेवाईक, मित्रमंडळींचा जीव टांगणीला लागला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. ६) रात्री साडेआठला बस मालक रशीद खान यांचा संपर्क झाला. गंगोत्री येथे यात्रेकरू सुखरूप असल्याचे त्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

ते म्हणाले, ‘‘यात्रेकरुंशी संपर्क होत नसल्याने माझाही जीव भांड्यात पडला होता पण रात्री सव्वा आठला बस चालक खलिदने पायी चालत जाऊन दूरवरून फोन केला. गंगोत्री येथे सर्व जण सुखरूप आहेत. मात्र, पाऊस सुरू आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे संपर्क होत नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा संपर्क साधू शकतो. हा संदेश यात्रेकरूंच्या सर्व नातेवाइकांना द्या, असे त्यांनी आवर्जून सांगितले.’’ अशी माहिती बस मालक रशीद खान यांनी दिली.
दरम्यान, अनेक नातेवाईक व अवसरी खुर्द ग्रामस्थांना यात्रेकरू सुखरूप असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यामुळे काळजीत असलेल्या सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापनासमवेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पुणे आपत्ती व्यवस्थापन यांचा संपर्क झालेला आहे. त्यांनी सांगितले, की पुण्यातील सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत. फक्त मोबाईल डिसचार्ज झाल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT