पुणे

लांडेवाडीत डोंगराला आग; दोन झोपड्या खाक

CD

मंचर, ता. १० : लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. ९) दुपारी डोंगराला लागलेल्या आगीत दोन झोपड्यांसह गोठा जळून खाक झाला. सुमारे एक लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, दोन महिलांच्या प्रसंगावधानामुळे दोन चिमुकल्यांचे प्राण वाचल्याने मोठा अनर्थ टळला.
लांडेवाडीतील दर्यावस्ती परिसरात ही घटना घडली. गुलाब केवाळे यांच्या गोठ्यातील शेती साहित्य, चारा व संसारोपयोगी वस्तू आगीत जळून खाक झाल्या, तर सागर केदारी यांची झोपडी पूर्णपणे जळाली. माही केदारी (८ महिने) व शिवांश केवाळे (१० महिने) ही बालके झोपडीत असताना परिसरातील महिलांनी धाडस दाखवून त्यांना सुरक्षित बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच खंडेराव आढळराव पाटील, अभिजित आढळराव पाटील, प्रदीप आढळराव पाटील, सोमनाथ आढळराव पाटील, अविनाश आढळराव पाटील, वनमजूर रामभाऊ उभे यांच्यासह ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. तहसीलदार डॉ. सचिन वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

गावकऱ्यांकडून तातडीची मदत
संकटात सापडलेल्या केदारी व केवाळे कुटुंबासाठी लांडेवाडी ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडवले. उपसरपंच अंकुश लांडे पाटील व खंडेराव आढळराव पाटील यांच्या आवाहनानंतर अवघ्या १५ मिनिटांत ५० हजार रुपयांची मदत जमा झाली. उद्योजक संजय थोरात यांनी केदारी कुटुंबाला दोन महिन्यांचा किराणा व शैक्षणिक साहित्य देण्याचे जाहीर केले. तर रमेश येवले यांनी २० हजार रुपयांची रोख रक्कम संबंधित कुटुंबाकडे सुपूर्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT