पुणे

पुण्यातील ११ रुग्णालयांना उच्च न्यायालयाचा दिलासा महात्मा फुले योजनेच्या सक्तीला आव्हान

CD

मुंबई, ता. ४ ः राज्य सरकारने २१ एप्रिल रोजी पुण्यातील धर्मादाय रुग्णालयांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची सक्ती करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्या याचिकेची दखल घेऊन, उच्च न्यायालयाने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह ११ रुग्णालयांना नुकताच तात्पुरता दिलासा दिला. न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली नसली तरी निर्णयाची सक्ती करण्यापूर्वी रुग्णालयांशी सल्लामसलत गरजेचे होते, असे निरीक्षणही नोंदवले.
यासोबतच याचिकाकर्त्यांनी आपले म्हणणे मांडणारे निवेदन सरकारकडे दोन आठवड्यांत सादर करावे. त्यानंतर सरकारने त्यावर योग्य तो निर्णय घ्यावा. तोपर्यंत याचिकाकर्त्या रुग्णालयांना निर्णयाची सक्ती लागू करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले. याचिकाकर्त्यांच्या विरोधात निर्णय गेल्यास त्यांच्यावर आणखी दोन आठवडे योजनेची सक्ती करू नये, असेही न्या. रेवती मोहिते-डेरे आणि डॉ. न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना तात्पुरता दिलासा देताना स्पष्ट केले. तसेच, निर्णय लागू करण्यापूर्वी भागधारकांचे बाजू ऐकायला हवी होती असा पुनरुच्चारही केला. दीनानाथ रुग्णालयासह इनलॅक्स अॅण्ड बुधराणी रुग्णालय, सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालय, रूबी हॉल क्लिनिक, माईर्स विश्वराज रुग्णालय, पूना रुग्णालय आणि संशोधन केंद्र, विल्लू पूनावाला स्मृती रुग्णालय, द एन.एम. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी, संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन, जहाँगीर रुग्णालय आणि केईएम रुग्णालयाने ही याचिका केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra financial Crisis: राज्यावर कर्जाचा बोजा वाढला, प्रत्येक नागरिकावर ८५ हजार २७८ रुपयांचे कर्ज..

शेअर बाजाराला युद्धझळा! कच्चे तेल महागले, गॅसची टंचाई; रुपयाची घसरगुंडी, सोनं झालं स्वस्त

Latest Marathi News Live Update : ‘शांत पश्चिम आशिया हा भारताच्या हिताचा’

Pune Accident: बारामती जळगाव येथील राज्यमार्गावरील भीषण अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको!

Shashikant Shinde: कंत्राटदार काय जावई आहे का?, शशिकांत शिंदे; सुरूर-पोलादपूर रस्त्याबाबत आक्रमक, महाबळेश्वर, पाचगणीचे पर्यटन अडचणीत!

SCROLL FOR NEXT