पुणे

लोड शेडिंगच्या त्रासात केला कंदिला खाली अभ्यास ; दररोजचा १४ किलोमीटरचा प्रवास कधी सायकलवरून तर कधी लिफ्ट मागून ; अनुराग गोरेने दहावीला मिळवले ९०.६० गुण

CD

MDH26B05335
फोटो ओळ - अनुराग गोरे

१४ किमी लिफ्ट मागत गाठली यशाची वाट
माढ्याच्या अनुरागला दहावीत ९०.६० टक्के; कंदिलाच्या प्रकाशात केला अभ्यास

किरण चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. ८ : घरची आर्थिक परिस्थिती बेताची, वस्तीवर नियमित लोडशेडिंग आणि शाळेत जाण्यासाठी दररोज १४ किलोमीटरचा प्रवास करताना वाहनचालकांकडून लिफ्ट मागण्याची वेळ...अशा प्रतिकूल परिस्थितीतही उपळाई खुर्द (ता. माढा) येथील केदार वस्तीवरील अनुराग अंकुश गोरे याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत ९०.६० टक्के गुण मिळवले आहेत. अनुराग हा माढ्यातील सहकारमहर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशालेचा विद्यार्थी आहे.

उपळाईत वस्तीवर असल्याने रोज लोडशेडिंग होत असल्याने अनुरागने अनेकदा कंदिलाच्या प्रकाशात, तर कधी मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात अभ्यास केला. तो पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तसेच आठवीच्या एनएमएमएस परीक्षेत गुणवत्ता यादीत आला होता. ऑलिंपियाड परीक्षेच्या दुसऱ्या फेरीसाठीही तो पात्र ठरला होता.
केदार वस्ती ते माढा हे सुमारे १४ किलोमीटरचे अंतर अनुराग दररोज प्रवास करत होता. शाळेत जाण्यासाठी तो अनेकदा रस्त्यावरून जाणाऱ्या मोटरसायकलस्वारांकडे लिफ्ट मागून ये-जा करीत असे.
अनुरागचे वडील अंकुश गोरे यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले असून आई बारावीपर्यंत शिकलेली आहे. ती अंगणवाडी सेविका म्हणून काम करते. मोठा भाऊ अनुप एम.ए.चे शिक्षण घेत आहे. गोरे कुटुंबाकडे केवळ एक एकर शेती असून अंकुश गोरे स्वतःच्या शेतासह इतरांच्या शेतातही मजुरी करतात. आर्थिक परिस्थिती मर्यादित असली तरी मुलांना उच्च शिक्षण द्यावे, अशी त्यांची जिद्द आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मुलांच्या शिक्षणासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.
अनुरागनेही आईला घरकामात आणि वडिलांना शेतीच्या कामात मदत करत अभ्यास सुरू ठेवला. आजी रुक्मिणी गोरे यांच्याकडून त्याला शिक्षणाची प्रेरणा मिळाली. ‘आई-वडिलांचे कष्ट फेडण्यासाठी अभियंता व्हायचे आहे.’ असे अनुरागने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT