MGV25B14981
मुंबई ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करताना नगरसेवक सोमनाथ माळी, अरुण किल्लेदार, गणेश धोत्रे, भारत नागणे, प्रवीण गोवे.
तीर्थक्षेत्र आघाडीच्या नगरसेवकांनी
उपमुख्यमंत्री पवारांची घेतली भेट
मंगळवेढा, ता. २८ : नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप विरोधात विजयी झालेल्या तीर्थक्षेत्र आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत शहरातील प्रश्नांसंदर्भात निवेदन दिले.
नगरपालिका निवडणुकीत २० सदस्यांपैकी ९ सदस्य भाजपचे विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि आघाडीचे नऊ सदस्य विजय झाले. तीर्थक्षेत्र आघाडीच्या काही नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट यांची भेट घेऊन शहरातील प्रश्नांवर निधी देण्याची मागणी केली. दरम्यान, उर्वरित काही प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथे भेट घेऊन निधीची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित नगरसेवकाचे सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी उपस्थितांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंगळवेढा शहरातील प्रलंबित महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी करून द्यावा. संतसृष्टी निर्माण करावी. भूमिगत गटारीचा प्रश्न मार्गी लावावा. शहराच्या बाहेरील अनेक कुटुंबे शासकीय सवलतीपासून वंचित आहेत. हद्दवाढ करून त्या कुटुंबांना देखील शहरांमध्ये समावेश करावा. प्रस्तावित बायपास मार्ग लोकवस्तीतून न नेता पर्यायी मार्गाने करण्यात यावा, या संदर्भात मागणी केली. यावेळी निधीची तरतूद करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राष्ट्रवादीचे नेते अरुण किल्लेदार, भारत नागणे, रामेश्वर मासाळ, सोमनाथ माळी, गणेश धोत्रे, प्रवीण गोवे, अनिल बोदाडे, तेजस सूर्यवंशी, प्रीती सूर्यवंशी, अश्विनी धोत्रे आदी उपस्थित होते.
----