पुणे

मंगळवेढ्याच्या प्रश्नावर खा.शिंदे व वारी परिवार या सामाजिक संस्थेचा आवाज

CD

मंगळवेढ्यासाठी प्रणितींचा आवाज; सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष

नदीकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान; सोडलेले पाणी मिळालेच नाही

मंगळवेढा, ता. १० : तालुक्यातील शेतकरी, नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. खा. प्रणिती शिंदे या किमान या प्रश्नावर आवाज उठवत असल्या तरी त्या विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांच्या प्रश्नाला सत्ताधारी पक्षाकडून गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना उजनीतून पाणी उशिरा सोडल्यामुळे नदीकाठच्या शेती पिकाचे नुकसान झाले. तोपर्यंत वीजपुरवठा खंडित केला. आता पुन्हा शेतकऱ्यांची आठ तास विजेची मागणी असताना ५ तास वीज देण्याची व्यवस्था केली. थकीत वीज बिलावरून बंद असलेली भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा नुकतीच खा.शिंदे यांच्या दौऱ्यानंतर सुरू करण्यात आली. शिवाय तालुक्याच्या ग्रामीण भागात रस्ते, आरोग्य, वीजेबरोबर शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रश्नही गंभीर आहे. कांद्याचा पीकविमा १८ कोटी दिला. मात्र, उर्वरित २५ हजार शेतकरी खरीप पीकविम्यापासून वंचित आहेत. घरकुलासाठी वाढीव ५० हजारांची घोषणा केली अद्याप काही लाभार्थी त्यासाठी तर काही लाभार्थी जागेसाठी प्रतीक्षेत आहेत. तर ८० टक्के लाभार्थी मोफत वाळूच्या प्रतीक्षेत आहेत. एक एप्रिल पासून मनरेगाची कामे तालुक्यात बंद आहेत. परंतु त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. ग्रामीण भागात महत्त्वाच्या वेळेला लाईट नसते ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती लवकर केले जात नसल्याच्या तक्रारी सुरू आहेत. प्रबळ विरोधक भगीरथ भालके व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विधानसभा लढवलेले अनिल सावंत हे देखील सत्तेच्या जवळ गेले. मात्र, सत्तेच्या जवळ जाऊन जनतेच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करत नसल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील सध्या जनतेच्या व शेतकरी प्रश्नावर सक्रिय होताना दिसत नाहीत.

वारी परिवार सक्रिय
शहरातील वारी परिवार या सामाजिक संस्थेने शहरातील प्रश्नावर सातत्याने आवाज उठवण्यास सुरुवात केली. त्यांनी बसवेश्वर स्मारकाचा प्रश्नासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यामुळे तो प्रश्‍न कागदावर आला आहे. शहरातील पाणी, आरोग्य, स्वच्छता या विषयावर देखील ते सक्रियपणे काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT