पुणे

यंदाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा मानस - चेअरमन संजय आवताडे

CD

फोटोओळ : MGV26B16742
मंगळवेढा : नंदूर येथील आवताडे शुगरच्या पाचव्या बॉयलरचे अग्निप्रदीपन करताना मान्यवर.

दुष्काळातही आवताडे शुगरचे गाळप वाढविण्याचे लक्ष्य
अध्यक्ष संजय आवताडे; पाचव्या बॉयलरचे अग्निप्रदीपन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. १६ : दुष्काळी परिस्थितीमुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम आव्हानात्मक ठरणार आहे. तरीही आवताडे शुगर यंदा इतर कारखान्यांपेक्षा अधिक ऊस गाळप करेल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष संजय आवताडे यांनी व्यक्त केला.
नंदूर येथील आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. या कारखान्याच्या पाचव्या बॉयलरच्या अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. प्रारंभी इलेक्ट्रिकल मॅनेजर संजय शिंदे आणि त्यांच्या पत्नी अनिता शिंदे यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा व होमहवन करण्यात आले. त्यानंतर नगरसेवक सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके आणि जनरल मॅनेजर सुधीर पाटील यांच्या हस्ते बॉयलरचे अग्निप्रदीपन झाले.
यावेळी दामाजीचे माजी संचालक भारत निकम, पंचायत समिती सदस्य विनायक यादव, बाबा कोंडूभैरी, सुहास पवार, शिरसू गोडसे, भीमाशंकर येणपे, वर्क्स मॅनेजर धैर्यशील जाधव, चीफ केमिस्ट सुनील पाटील, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, शेती अधिकारी राहुल नागणे, उपशेती अधिकारी तोहीत शेख, ऊस पुरवठा अधिकारी दामोदर रेवे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
------------------------
मागील हंगामात गाळपाचा उच्चांक
ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे मागील हंगामात कारखान्याने चार लाख आठ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य मोबदला मिळावा, यासाठी कारखाना व्यवस्थापन नेहमीच चांगला ऊसदर देण्याचा प्रयत्न करते. यंदाही शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस आवताडे शुगरला पुरवठा करावा.’ यंदाच्या हंगामात अधिकाधिक ऊस गाळप करून प्रगतीचा नवा टप्पा गाठण्याचा विश्वासही आवताडे व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Death Penalty: मेरठ कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! पतीला साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकराला फाशीची शिक्षा

Baramati News : सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीवर बारामतीत ‘इनोव्हेशन व्हॅली’ उभारणार! शरद पवार यांची घोषणा....

Pune Crime : अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा निर्घृण खून; तिघेजण ताब्यात

Jharkhand Health : जिल्हा रुग्णालयांत सुरू होणार DNB पदव्युत्तर अभ्यासक्रम; आरोग्य विभागाचा पायलट प्रोजेक्ट

Farmer Scheme: शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून 5,000 रुपये मिळणार; कसा कराल अर्ज?

SCROLL FOR NEXT