पाणीपुरवठा सुरळीत करा;
अन्यथा ‘ढोल बजाव’ आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १५ : शहरातील विस्कळित पाणीपुरवठ्याविरोधात सार्वजनिक नागरी सुविधा समितीने महापालिका प्रशासनाला इशारा दिला असून पाणीपुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास ‘ढोल बजाव’ आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.
समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांच्या नेतृत्वाखालील भालचंद्र खैरनार, शाम भावसार, तुलशीराम पाटकर, राहुल शिंदे, अमृत गुरव, चेतेश आसेरी, तुषार छाजेड, करण शाह, हर्षद गुप्ता, रोहित साकला, बाबा अहिरे, राकेश मगर, राजेंद्र तलरेजा, मौलिक तूकिया, योगेश वैद्य, दीपक कायस्थ, गौतम सोनवणे आदींनी निवेदन दिले.
मालेगावला दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन असताना प्रत्यक्षात आठ-आठ दिवसांनी पाणी मिळते. अभियंत्यांची संख्या पुरेशी असूनही गळती दुरुस्तीसाठी अनावश्यक विलंब होतो. संगमेश्वर व कलेक्टर परिसरात नळ सुरू झाल्यानंतर सुरुवातीला पिवळसर व अशुद्ध पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असा आरोप समितीने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.