MLS26B02748
माळशिरस ः पळसमंडळ गावाकडे टँकर रवाना करताना उपअभियंता जे. व्ही. सदावरे व उपस्थित अधिकारी.
माळशिरसच्या तीन गावांतील २१ वस्त्यांसाठी टॅँकर सुरू
पळसमंडळ, सुळेवाडी अन् पिंपरीसाठी प्रशासनाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
माळशिरस, ता. १२ : तालुक्यातील पळसमंडळ, सुळेवाडी आणि पिंपरी या तीन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असून, दररोज १ लाख ९९ हजार १९९ लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. संबंधित टँकर आज त्या-त्या गावांकडे रवाना करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे पाणीपुरवठा उपअभियंता जे. व्ही. सदावरे यांनी दिली.
यावेळी शाखा अभियंता ए. एन. आंबले, जे.व्ही. घोळवे, वरिष्ठ सहायक एस.आर. करांडे, सहायक स्थापत्य अभियंता एस.आर. मोरे आदी उपस्थित होते.
पळसमंडळ येथील फडतरी वस्ती, चव्हाण वस्ती, माने-साळुंखे वस्ती, पाडुळे-भाळे वस्ती, करेवस्ती तसेच शिंदे-वाघमोडे वस्ती अशा सहा वस्त्यांसाठी २५ हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या दररोज चार खेपा करण्यात येणार आहेत.
सुळेवाडी येथील इरकर वस्ती आणि फुले वस्ती या दोन वस्त्यांसाठी १० हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या दररोज दोन खेपा होणार आहेत.
पिंपरी येथील खडकमाळ, लक्ष्मीनगर, हरणटेक वस्ती, गायरान वस्ती, बाळूमामावाडी, बजबळकर वस्ती, उंबरदेव, बाड वस्ती, दत्तनगर, दत्ताडे वस्ती, राणे वाडी, लांडी वस्ती आणि कोथळवाट अशा १३ वस्त्यांसाठी २४ हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या दररोज तीन खेपा करण्यात येणार आहेत.
----
मागील वर्षी २५ मार्चपासून सुरू
गतवर्षी २५ मार्चपासूनच टँकर सुरू करावे लागले होते. तसेच मे महिन्यात तालुक्यात १० टँकर सुरू होते. मात्र यंदा आजअखेर तीन टँकर सुरू करण्यात आले आहेत. कदमवाडी गावाचा प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाल्याची माहितीही सदावरे यांनी दिली.
--
यंदा पाऊस लांबण्याच्या अंदाजाने धास्ती
यावर्षी हवामान विभागाने पाऊस लांबणार असल्याचा इशार दिला आहे. पाऊस लांबल्यास या गावातील टॅँकरच्या खेपा वाढवाव्या लागणार आहेतच. शिवाय अन्य गावातही टॅंकर सरू करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.