पुणे

सावंतवाडी ठरला छावा चषकाचा मानकरी

CD

सावंतवाडी क्लब छावा चषकाचा मानकरी

मार्डीच्या युथ फ्रेंड्स जिमखान्यातर्फे क्रिकेट स्पर्धा; गोजिरी ११ दहिवडी संघाला उपविजेतेपद

दहिवडी, ता. ८ : अतिशय रोमहर्षक ठरलेल्या व प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभलेल्या छावा चषकाचा मानकरी सावंतवाडी क्रिकेट क्लब ठरला. मार्डी येथील युथ फ्रेंड्स क्लब जिमखाना यांनी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

अंतिम सामन्यात सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना फटकेबाजी करत पाच षटकांत तब्बल ९९ धावा फटकावल्या. गोजिरी ११ दहिवडी संघाला हे भले मोठे आव्हान पेलवले नाही. हा संघ ८३ धावांपर्यंतच मजल मारू शकला. गोजिरी ११ दहिवडी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. एम. के. ११ पळशी, प्रेमराज ११ आंधळी, युथ फ्रेंड्स जिमखाना ४०+ व युथ फ्रेंड्स जिमखाना माण हे संघ अनुक्रमे तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकावर राहिले.
मालिकावीर- लखन नागरगोजे (पळशी), उत्कृष्ट फलंदाज- अलिश वायदंडे (दहिवडी), उत्कृष्ट गोलंदाज- मिलिंद भोसले (सावंतवाडी), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- करण मोटे (मार्डी) हे वैयक्तिक पुरस्कार देण्यात आले.
राम पोळ, राजू पोळ व युथ फ्रेंड जिमखान्याच्या खेळाडूंनी या स्पर्धेचे नेटके नियोजन केले होते. या स्पर्धेत आठ गावांचे, चार नगरपंचायतींचे, चार तालुकास्तरीय, तर चार चाळीस वर्षे वयावरील खेळाडूंचे असे एकूण वीस संघ सहभागी झाले होते.
मनोज पोळ, अभिजित काळे, राम पोळ, श्रीमंत काळे, हणमंत पोळ, सुदाम नारणवर, विकी सरतापे, शैलेश बडवे, सनी साठे, बापू सावंत व ग्रामस्थ मार्डी यांच्या हस्ते व उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले.
...........
चौकट :

४०+ खेळाडूंचा लक्षवेधी सहभाग

या स्पर्धेच्या निमित्ताने चाळीस वर्षे पूर्ण झालेल्या खेळाडूंना खास संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. यात मार्डी, गोंदवले, बिदाल व मलवडी हे चार संघ सहभागी झाले होते. चाळीस ते अगदी साठ वर्षांच्या खेळाडूंना पुन्हा खेळताना बघून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
............
छायाचित्र
MLV26B07516
मार्डी : छावा चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या सावंतवाडी संघास चषक देताना मान्यवर. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
...... पुर्ण.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update Weather Expert : जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सून भारतात, हवामान तज्ज्ञांचा अंदाज; भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला गती

Akola News: शहरासह पातूर तालुक्यात रेशनचा काळाबाजार;रेशन माफिया सक्रिय; शासकीय धान्य परप्रांतात करत आहेत विक्री; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Indian Navy Chief: कोण आहेत व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन? पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती

Nilesh Lanke Health Update : खासदार निलेश लंके हेल्थ अपडेट आली, विषाणूजन्य ताप; डॉक्टरांनी दिला अहवाल

एका न्यायाधीशाच्या वाक्याने बदललं CJI Surya Kant यांचं भविष्य; वकिलाची याचिका फेटाळताना सांगितला आयुष्यातला सर्वात मोठा धक्का

SCROLL FOR NEXT