पुणे

स्वच्छतेचा वसा घेतलेला ''दशरथ''

CD

MOD26A03508 मोडनिंब ः येथे आरोग्यदूत दशरथ कणसे रामप्रहरी रस्ते स्वच्छ करताना.

ना अपेक्षा, ना कौतुक; तरीही स्वच्छतेचे व्रत
मोडनिंब बसस्थानक परिसरात रामप्रहरी स्वच्छता करणारे दशरथ कणसे

विरण कुलकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
मोडनिंब, ता. ५ : स्वच्छतेच्या नावाखाली प्रसिद्धीसाठी हातात झाडू घेऊन रिल्स करणाऱ्यांची संख्या वाढत असताना, मोडनिंब बसस्थानक परिसरात कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता रामप्रहरी हातात झाडू घेऊन रस्ता स्वच्छ करणारा एक चेहरा मात्र अनेकांच्या नजरेत भरतो. हे नाव आहे दशरथ कणसे यांचे.
कोणत्याही संस्थेचा पाठिंबा नाही, पाठीवर कौतुकाची थाप नाही, की पगाराची अपेक्षाही नाही; तरीही कणसे नियमितपणे बसस्थानक परिसरातील रस्त्यांची स्वच्छता करतात. हातात झाडू घेऊन आपल्या कामात मग्न असलेले कणसे अनेकदा धुळीच्या लोटात अस्पष्ट दिसतात. काही लोक त्यांना ‘भोळसट’ म्हणतात; मात्र हाच भोळसटपणा आज मोडनिंबकरांसाठी स्वच्छतेची जाणीव करून देणारा ठरत आहे.
त्यांच्या या कामामुळे रस्ते स्वच्छ राहण्यास मदत होतेच, शिवाय मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनाही अस्वच्छतेपासून काही प्रमाणात मुक्ती मिळते. प्रसिद्धीपासून दूर राहून सातत्याने स्वच्छतेचे काम करणारा हा चेहरा त्यामुळे वेगळा ठरतो.

कोट MOD26A03505
- काही जण या कामाला वेडेपणा किंवा भोळसटपणा समजतात. स्वच्छता करून रस्ते टापटीप करणारा माणूस भोळसट कसा असू शकतो? त्यांच्या या कामामुळे केवळ रस्तेच स्वच्छ होत नाहीत, तर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या मोडनिंबकरांनाही अस्वच्छतेपासून मुक्ती मिळते.
- हनुमंत गडधरे, वृत्तपत्र व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT