श्री शिवाजी विद्यालयाचा
मसूरला स्नेहमेळावा उत्साहात
मसूर, ता. २७ : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय, मसूर येथील इयत्ता दहावीच्या १९६८ बॅचच्या वर्गमित्रांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. या मेळाव्यात तब्बल ५८ वर्षांनंतर जुने सवंगडी एकत्र आले. या वेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा दिला. डॉ. सतीश भिसे यांनी प्रास्ताविक केले. सिद्धेश्वर राजमाने यांनी ‘उतारवयात घ्यावयाची काळजी’ या विषयावर ऊहापोह केला.
या वेळी नंदिनी जोशी, अलका मोहोळकर, प्रमिला नलवडे, सुप्रभा मणियार, चंदा गायकवाड, कमल महाडिक आदींनी स्नेहमेळाव्यात हजेरी लावली. चंद्रकांत भस्मे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता चहापानाने झाली.
--------------------------
02382
मसूर : स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित माजी विद्यार्थी व शिक्षक.
-------------------------