पुणे

धुळदेव ग्रामपंचायतीत विकासाच्या नावाखाली हजारो पानांचा दावा; प्रत्यक्षात गावात मूलभूत सुविधांचा अभाव – अमोल कोळेकर पाटील

CD

धुळदेवला मूलभूत सुविधांचा अभाव

विकासकामांची माहिती मागवल्‍यावर मात्र ४७ हजार पानांचा उतारा

म्हसवड, ता. ११ : धुळदेव (ता. माण) ग्रामपंचायतीमध्ये विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्ष गावामध्ये रस्ते, पाणी, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल कोळेकर यांनी केला आहे.
अमोल कोळेकर यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत धुळदेव येथे २०१५ ते २०२५ या कालावधीत गावाच्या विकासासाठी किती निधी प्राप्त झाला, कोणती विकासकामे करण्यात आली आणि किती खर्च झाला, यासंदर्भातील माहिती मागवली होती. मात्र, या माहितीच्या उत्तरामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने तब्बल ४७ हजार ८५० पाने असून, त्यासाठी ९५ हजार ७०० रुपये शुल्क भरावे लागेल, असे पत्राद्वारे कळविले आहे. त्‍यामुळे ही माहिती सामान्यांपासून दूर ठेवण्याचाच हा प्रयत्न असल्याचा आरोपही कोळेकर यांनी केला आहे.
“जर ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असतील, तर तो विकास प्रत्यक्ष गावामध्ये का दिसून येत नाही? आजही गावात रस्ते नाहीत, पाण्याची समस्या गंभीर आहे, आरोग्य सुविधा नाहीत आणि मूलभूत गरजांसाठी नागरिकांना संघर्ष का करावा लागत आहे,” असा सवाल अमोल कोळेकर यांनी उपस्थित केला आहे.
....................................
विकासकामांच्‍या माहितीची पीडीएफ द्या
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, संबंधित माहिती पीडीएफ किंवा सॉफ्ट कॉपी स्वरूपात उपलब्ध करून द्यावी, तसेच ग्रामपंचायत धुळदेवमध्ये झालेल्या विकासकामांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT