पुणे

पाकिस्तानचे आव्हान कायम

CD

न्यूयॉर्क, ता. ११ ­­: अमेरिका व भारत यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट संघाने मंगळवारी टी-२० विश्‍वकरंडकातील पहिला विजय नोंदवला. पाकिस्तानने ‘अ’ गटातील लढतीत कॅनडावर सात विकेट राखून मात केली आणि या स्पर्धेतील पुढल्या फेरीत पोहोचण्याचे आव्हान कायम राखले.

कॅनडाकडून १०७ धावांचे आव्हान पाकिस्तानसमोर ठेवण्यात आले. डिल्लॉन हेलिगर याने सईम अयुबला सहा धावांवर बाद केले. पण त्यानंतर कर्णधार बाबर आझम (३३ धावा) व महम्मद रिझवान (नाबाद ५३ धावा) या अनुभवी जोडीने ६३ धावांची भागीदारी करीत पाकिस्तानचा डाव सावरला व विजयाची आशा कायम ठेवली. हेलिगर यानेच बाबरला बाद केले. त्यानंतर रिझवानने दोन चौकार व एक षटकारासह अर्धशतकी खेळी करीत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
याआधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कॅनडाचा सलामीवीर ॲरोन जॉन्सन वगळता इतर फलंदाजांना पाकिस्तानच्या गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावता आले नाही. जॉन्सन याने ४४ चेंडूंमध्ये चार चौकार व चार षटकारांसह ५२ धावांची खेळी साकारली. नसीम शाहच्या गोलंदाजीवर तो १४व्या षटकात बाद झाला. त्यावेळी कॅनडाच्या धावा होत्या ७३. यामधील त्याचा वाटा होता ५२ धावांचा.
ॲरोन जॉन्सन व्यतिरिक्त साद जफर (१० धावा) व कालीम साना (नाबाद १३ धावा) या दोनच फलंदाजांना दुहेरी आकडी धावा करता आल्या. महम्मद आमीरने १३ धावा देत दोन फलंदाज बाद केले. हारिस रौफने २६ धावा देत दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. शाहीन शाह आफ्रिदी व नसीम शाह यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. कॅनडाने २० षटकांत सात बाद १०६ धावा फटकावल्या.

संक्षिप्त धावफलक ­­: कॅनडा - २० षटकांत सात बाद १०६ धावा (ॲरोन जॉन्सन ५२, महम्मद आमीर २/१३, हारिस रौफ २/२६) पराभूत वि. पाकिस्तान - १७.३ षटकांत तीन बाद १०७ धावा (मोहम्मद रिझवान नाबाद ५३, बाबर आझम ३३, डिल्लॉन हेलिगर २/१८).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: मीराबाई चानूची स्वप्नपूर्ती! आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकले पहिले पदक; भारताची पदकतालिकेत आगेकूच

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT