दुबई, ता. १४ : न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने सोमवारी झालेल्या टी-२० विश्वकरंडकातील साखळी फेरीच्या लढतीत पाकिस्तानचा ५४ धावांनी धुव्वा उडवला. या स्पर्धेतील तिसऱ्या विजयासह न्यूझीलंडने सहा गुणांसह अगदी रुबाबात उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र भारतीय महिला संघाचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.
न्यूझीलंडकडून पाकिस्तानसमोर १११ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. मात्र पाकिस्तानचा डाव ५६ धावांमध्येच गडगडला. पाकिस्तानच्या दोनच खेळाडूंना दुहेरी आकडी धावसंख्या करता आली. अमेलिया कीरने तीन फलंदाज बाद केले. त्याआधी सुझी बेट्स हिने २८ धावांची, ब्रुक हॅलीडेने २२ धावांची खेळी साकारली. न्यूझीलंडने २० षटकांत सहा बाद ११० धावा केल्या. अ गटातून भारत, पाकिस्तान व श्रीलंका या आशियाई देशांतील संघ गारद झाले. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड- २० षटकांत सहा बाद ११० धावा (सुझी बेट्स २८, ब्रुक हॅलीडे २२, नाशरा संधू ३/१८) विजयी वि. पाकिस्तान सर्व बाद ५६ धावा (फातिमा सना २१, मुनीबा अली १५, अमेलिया कीर ३/१४).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.