पुणे

प्रो कबड्डी... क्रीडा बातमी...

CD

पुणेरी पलटण-यूपी योद्धाजमध्ये बरोबरी

प्रो कबड्डी : पाटणाकडून बंगळूर पराभूत

नोईडा, ता. १९ : पुणेरी पलटण व यूपी योद्धाज यांच्यामध्ये प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या मोसमातील मंगळवारची लढत २९-२९ अशी बरोबरीत राहिली. अखेरच्या दीड मिनिटांत भवानी राजपूतला रोखण्यात अपयश आलेल्या पुणेरी पलटण संघाला झुंजार खेळ करूनही २९-२९ असे बरोबरीवर समाधान मानावे लागले. अखेरच्या दीड मिनिटांत महत्त्वपूर्ण तीन गुणांची कमाई करून भवानीने संघाचा पराभव टाळला. पुणेरी पलटणकडून कर्णधार पंकज मोहिते आणि व्ही. अजित कुमार यांचा खेळ उल्लेखनीय झाला.
अस्लम इनामदार पाठोपाठ मोहित गोयत यांच्या गैरहजेरीत पुणेरी पलटणची चढाईची बाजू पूर्वार्धात निश्चित दुबळी दिसून आली. मात्र, उत्तरार्धात पंकज मोहितेने केलेल्या दमदार चढायांमुळे पुणे संघाला सामन्यात आव्हान राखणे शक्य झाले होते. पंकजने ९ गुणांची कमाई केली. व्ही. अजितकुमारने ५ गुणांची कमाई करताना त्याला सुरेख साथ केली. पुणे संघाने संघात या लढतीत अनेक बदलदेखील केले. त्यामुळे पूर्ण सामन्यात संघ काहीसा अस्थिर वाटला. डावा कोपरारक्षक अमनच्या जागी संधी मिळालेल्या मोहितने ४ आणि गौरव खत्रीने ३ गुण नोंदवत आपले काम चोख बजावले. यूपी संघाकडून भवानीचे सुपर टेन वगळता अन्य खेळाडूला मोठी चमक दाखवता आली नाही. मात्र, प्रत्येकाने गुणांची कमाई केल्याचा यूपी संघाला फायदा झाला.
मध्यंतरानंतर हळूहळू चढाईपटूंनी लय मिळवली. पुणे संघासाठी पंकज मोहिते आणि यूपी संघासाठी भवानी राजपूत यांच्या चढाया महत्त्वाच्या ठरत होत्या. यामुळे पुणे संघाला पहिल्या टप्प्यात २०-२० अशी बरोबरी राखता आली. अखेरच्या टप्प्यातील सुरुवातीलाच पुणेरी संघाने यूपी संघावर लोण चढवत आघाडी २५-२१ अशी आपल्याकडे झुकवली. त्यानंतर पुणे संघाने सातत्याने चार गुणांची आघाडी राखली होती. मात्र, दीड मिनीट शिल्लक असताना भवानी राजपूतने कौशल्याने मध्यरेषा गाठत दोन गुणांची कमाई करताना सामना २८-२९ अशा रंगतदार स्थितीत आणला. अखेरच्या एक मिनिटांत यूपी संघाने एका गुणाची कमाई करताना सामना २९-२९ असा बरोबरीत सोडवला.
पूर्वार्धात ४-० अशा धडाकेबाज सुरुवातीचा फायदा पुणेरी संघाला उठवता आला नाही. सामन्यात लय पकडल्यावर यूपी संघाच्या बचावपटूंसमोर पुणे संघाचे चढाईपटू अपयशी ठरले. अर्थात, यूपी संघाची अवस्था काही वेगळी नव्हती. त्यांचे चढाईपटूही पुणे संघाच्या बचावपटूंना समर्थपणे आव्हान देऊ शकत नव्हते. पण, पुणे संघावर लोण चढवल्याचा फायदा त्यांना मध्यंतराला १६-१४ अशी आघाडी मिळवून देण्यात निर्णायक ठरला.

शानदार विजय
पाटणा पायरेट्‌स संघाने मंगळवारी पार पडलेल्या अन्य लढतीत बंगळूर बुल्स संघावर ५४-३१ असा शानदार विजय मिळवला. देवांक व अयान यांनी पाटणाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अक्षित व सौरभ नांदल यांनी यांनी बंगळूरसाठी समाधानकारक कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT