पुणे

प्रो कबड्डी... क्रीडा बातमी...

CD

तेलुगू टायटन्सचा यू मुंबावर रोमहर्षक विजय

प्रो कबड्डी : आशीष नरवाल चमकला

नोएडा, ता. २० : तेलुगू टायटन्स संघाने बुधवारी प्रो कबड्डी लीगच्या साखळी फेरीत यू मुंबा संघावर ३१-२९ असा रोमहर्षक विजय मिळवला. या पराभवानंतरही यू मुंबाचा संघ ४० गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तेलुगू टायटन्सचा संघ सातव्या विजयासह ३७ गुणांनिशी पाचव्या स्थानावर आहे. आशीष नरवालने तेलुगू टायटन्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तेलुगू टायटन्स - यू मुंबामध्ये सुरुवातीपासूनच अटीतटीची लढत पाहायला मिळाली. पूर्वार्धात दोन्ही संघांमध्ये १२-१२ अशी बरोबरी झाली. उत्तरार्धातही दोन्ही संघांमध्ये चढाओढ प्रकर्षाने दिसून आली. मात्र या सत्रामध्ये तेलुगू संघाने १९, तर यू मुंबाने १७ गुणांची कमाई केली. या सत्रातील दोन गुणांचा फरक शेवटी निर्णायक ठरला.
तेलुगूच्या विजयात आशीष नरवाल याच्यासह सागर (४ गुण), अजित पवार (४ गुण), मनजित (४ गुण) यांनी चमक दाखवली. शंकर गदई यानेही ठसा उमटवला. यू मुंबाकडून मनजीतने सात गुणांची कमाई केली. रोहित राघवने पुन्हा एकदा आपली धमक दाखवली. त्याने आठ गुणांची कमाई केली. पण मनजित व रोहितच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

दिल्ली - गुजरातमध्ये बरोबरी
दबंग दिल्ली - गुजरात जायंट्‌स यांच्यामध्ये प्रो कबड्डी स्पर्धेतील बुधवारी अन्य लढत रंगली. अखेरच्या चढाईपर्यंत रंगलेली ही लढत ३९-३९ अशी बरोबरीत राहिली. दबंग दिल्लीकडून नवीनकुमार (९ गुण) व आशू मलिक (११ गुण) यांनी विजयासाठी अथक परिश्रम केले. गुजरात जायंट्‌सकडून परतीक दहिया याने एकट्याने २० गुणांची कमाई करीत सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही संघांमध्ये बरोबरी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT