माणगाव, ता. ४ : ताम्हिणी घाटात एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील मुळशीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. मानसकुमार साहू (वय ३८) आणि सखूबाई कानवडे (वय ६५) अशी मृतांची नावे आहेत.
खेड आगाराची बस मंगळवारी दुपारी खेडहून चिंचवडकडे निघाली होती, तर कार पुण्यावरून महाडच्या दिशेने येत होती. ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावानजीक दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात कारमधील दोन प्रवासी मानसकुमार निरंजन साहू (रा. पौड) आणि सखूबाई तुकाराम कानवडे (रा. मुळशी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. रूपाली मानसकुमार साहू (वय २८), रमा मानसकुमार साहू (वय ७) आणि ताराबाई बाळू नलावडे (वय ४५) अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास माणगाव ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोराडे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.