पुणे

राज्य ऑलिंपिक समितीच्या महासचिवपदी संजय शेटे

CD

मुंबई, ता. १४ : महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेची निवडणूक २ नोव्हेंबरला पार पडली. मात्र, या निवडणुकीतील विजयी उमेदवारांना कोणती पदे मिळणार, याबाबतची घोषणा करण्यात आली नव्हती. अखेर शुक्रवारी महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अजित पवार यांना अध्यक्षपद, तर मुरलीधर मोहोळ यांना वरिष्ठ उपाध्यक्षपद आधीच देण्यात आले होते. संजय शेटे यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
बॅडमिंटन खेळातील अरुण लखानी यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली. शैलेश टिळक, उदय डोंगरे, नीलेश जगताप व प्रदीप खांडरे यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. चंद्रजित जाधव व प्रशांत देशपांडे यांची सहयोगी उपाध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली आहे.
संघटनेला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे अहवाल द्यावा लागणार आहे. यासाठी एक महिन्याचा कालावधी असणार आहे. घटनाबाह्य निवडणूकसह इतर बाबींबद्दलचा हा अहवाल असणार आहे. तसेच सहा महिन्यांच्या आतमध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळवण्याचे आव्हान राज्य ऑलिंपिक संघटनेसमोर असणार आहे.

सर्व खेळांना स्थान
राज्य संघटनेच्या नव्या कार्यकारिणीत सर्व खेळांतील पदाधिकाऱ्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ॲथलेटिक्स संबंधित खेळातील व्यक्ती इच्छुक नव्हती. त्यामुळे त्या खेळातील व्यक्तीचा समावेश नाही. हँडबॉल संघटनेत वाद असल्यामुळे त्यांचाही पदाधिकारी या समितीत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT