पुणे

शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीमेमुळे पालक संतप्त

CD
शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. १५ : जिल्ह्यात शिक्षकांची हजारो पदे रिक्त असताना आणि अनेक शिक्षक इतर शासकीय कामांत गुंतलेले असतानाच शिक्षण विभागाने १५ ते ३० जुलैदरम्यान शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम जाहीर केली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ अंतर्गत ६ ते १४ वयोगटातील शिक्षणापासून वंचित, अनियमित उपस्थिती असलेली तसेच स्थलांतरित मुले शोधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. गावे, झोपडपट्ट्या, वीटभट्ट्या, बांधकामस्थळे, उसतोड कामगारांच्या वसाहती, रेल्वे-बसस्थानके आदी ठिकाणी प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाणार आहे. महसूल, ग्रामविकास, महिला व बालविकास, आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येणार असून आढळलेल्या प्रत्येक शाळाबाह्य बालकाला तातडीने शाळेत दाखल करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. पालकांची नाराजी दरम्यान, यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणी पालक संघाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

Supreme Court: 'अपार आयडी'ला सुप्रीम कोर्टाचा रेड सिग्नल! 26 कोटी विद्यार्थ्यांचा प्रश्न; कोर्टाचा मोठा निर्णय

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींची तीन तासांनंतर सुटका; बाहेर आल्यानंतर प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया...

Marathi Culture: डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या साहित्यिक वारशाचा गौरव; ‘संस्कृती-संशोधन केंद्रा’त चार पुस्तकांचे प्रकाशन

Ambad Highway Chaos: अंबडमध्ये महामार्गावर मोकाट जनावरांचा धुमाकूळ; वाहतुकीला अडथळा, नागरिकांचा जीव मुठीत

SCROLL FOR NEXT