मीरा भाईंदरमधील २५४ एकर
जमीन बिल्डरांच्या घशात?
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. ९ : मीरा भाईंदर येथील ६००० कोटी रुपये किमतीची २५४.८८ एकर शासकीय जमीन खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव महायुती सरकारने आखला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. प्रशासकीयस्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई करून सरकारने जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ही जमीन मूळची राज्य सरकारची असताना कोणतीही पूर्वपरवानगी न घेता महसुली अभिलेखात बदल करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन सरकारकडे वर्ग करण्याचे आदेश दिले, तरीही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा का झाला नाही? उच्च न्यायालयाने ३० एप्रिल रोजी दिलेल्या निकालात ही जमीन ‘मीरा सॉल्ट वर्क्स’च्या मालकीची असल्याचे मान्य केले. यावर टीका करताना, न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकारी वकील झोपले होते का? विधी विभागाने भक्कम बाजू का मांडली नाही? असे सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.