पुणे

बाबूराव बोत्रे पाटील यांना उद्योग पुरस्कार जाहीर

CD

न्हावरे, ता. २७ : ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांना अग्निशपंख फाउंडेशन श्रींगोदा जिल्हा अहिल्यानगर यांच्या वतीने बेस्ट बिझनेस अवॉर्ड जाहीर झाला आहे.
सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव (जि.सातारा) येथे रविवारी (ता. २८) दुपारी साडेतीन वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. बाबूराव बोत्रे पाटील यांनी अल्पावधीत ओंकार शुगर ग्रुपच्या वतीने महाराष्ट्रात बंद पडलेले १७ साखर कारखाने चालवण्यासाठी घेतले ते यशस्वीरीत्या चालवत आहेत. प्रत्येक कारखान्याकडे गळितासाठी आलेल्या उसापोटी शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत पेमेंट केले जाते, त्याचबरोबर कामगारांना पाच तारखेच्या दरम्यान पगार केला जातो. या १७ कारखान्याच्या माध्यमातून ओंकार ग्रुपला ८ लाख शेतकरी व २ लाखांपेक्षा अधिक वाहतूकदार जोडले गेले आहेत. तर १६ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी या ग्रुपमध्ये काम करीत आहेत. एकूणच संस्था, शेतकरी , कामगार, वाहतूकदार व पुरवठादार यांना केंद्र बिंदुमानून काम करीत असल्यामुळे संस्था प्रगतिपथावर असल्याची माहिती बोत्रे पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: बीएमसीच्या तिजोरीवर कुणाचा ताबा? मनपातील पॉवर गेम सुरू; स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार? 'यांची' नावे चर्चेत

IND vs PAK : हार्दिक पांड्याचा ०.१८ सेकंदाचा Video, सोबत महिका शर्मा...! BCCI च्या पॉलिसीवर गंभीर प्रश्नचिन्ह

T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचं ऑस्ट्रेलियाला हरवणे भारताच्या फायद्याचं; आता वर्ल्ड कप आपलाच...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनाधिकृत बांधकामांवर जोरदार कारवाई

Pune Crime : पुण्यात सोनसाखळी चोरांचा धुमाकू; सिंहगड रस्त्यावर ९० हजारांचे मंगळसूत्र लंपास

SCROLL FOR NEXT