पुणे

आरोपींना १२ तासांच्या आत अटक

CD

खुनाच्या गुन्ह्यातील तीन संशयित १२ तासांत जेरबंद

माळशिरस तालुक्यातील तांबेवाडी येथील घटना; मागील भांडणाचा राग

नातेपुते, ता. १० ः माळशिरस तालुक्यातील चंद्रपुरी तांबेवाडी येथे झालेल्या तरुणाच्या खूनप्रकरणातील तीन संशयितांना पोलिसांनी १२ तासांत अटक केली.
चंद्रपुरी तांबेवाडी येथे शुक्रवारी (ता. ८) महावीर सुखदेव खोमणे, स्वाती सुखदेव खोमणे, रोहित उर्फ चिक्या पोपट खोमणे या तिघांनी मागील भांडणाचा राग मनात धरून अतुल वसंत गिरे (वय २९, मूळ रा. देवदैठन ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर सध्या रा. चंद्रपुरी तांबेवाडी) यांचा कोयता, दांडके व रॉडने मारून खून केला.
शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी फिर्यादी यांचे पती अतुल गिरे व महावीर खोमणे यांच्यात कारणावरून वादावादी झाली होती. त्यानंतर रात्री ११ वा.२५ मिनिटांच्या सुमारास अतुल गिरे हे त्यांना जाब विचारण्यास महावीर खोमणे याचे घरी गेले असता त्यांचेत वादावादी सुरू झाली. त्यावेळी महावीर याने कोयत्याने डोक्यात, चेह-यावर, मारून गंभीर जखमी केले. तसेच त्याची आई स्वाती हिने दांडक्याने हातावर, पायावर, पाठीवर, चेह-यावर, मारहाण करून गंभीर जखमी केले. रोहित याने रॉडने हातावर, पायावर व पाठीवर मारून गंभीर जखमी करून अतुल वसंत गिरे यास जिवे ठार मारले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांंच्या मार्गदर्शनाखाली यातील संशयितांची गोपनीय माहिती घेऊन व तांत्रिक तपासाआधारे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व पोलिस कर्मचारी सोनल मोरे, रविंद्र गायकवाड, जावेद जमादार, सुभाष गोरे, धनाजी शेळके, अमोल वाघमोडे, रणजित मदने, सोमनाथ मोहिते, महिला नेहा बोंदर, अमोल देशमुख, सुधीर हांगे, जावेद आतार व वारे, राहुल वाघमोडे यांच्या पथकाने संशयितांना तावशी (ता. इंदापूर) येथून अटक केली.

पोलिसांनी फिरवली तपासाची चक्रे
याबाबत मृत अतुल यांची पत्नी दिव्या अतुल गिरे यांनी नातेपुते पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सदर झालेल्या घटनेची माहिती नातेपुते ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. तपासाची चक्रे फिरवून सदर खुनातील संशयित महावीर खोमणे, स्वाती खोमणे, रोहित खोमणे या तिघांना अवघ्या १२ तासांत जेरबंद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Second Setback : हसन मुश्रीफांना सलग दुसरा राजकीय धक्का! जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंचा जातीचा दाखला अवैध

सोने-चांदीच्या भावात विक्रमी घसरण, ३ वर्षांची वाढ झाली कमी; जाणून घ्या आज किती भाव

Latest Marathi News Live Update : विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी, धूम ठोकून फरार, परिसरात भीतीचे वातावरण

Pune Trekking : ट्रेकर्ससाठी महत्त्वाचा इशारा! पर्यटकांनो साहस करा; पण जपून, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना काळजी घेण्याचे आवाहन

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इतरांना धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT