पुणे

रुपाली चाकणकरांवर ‘एसआयटी’कडून प्रश्नांचा भडिमार

CD

चाकणकरांवर ‘एसआयटी’कडून प्रश्नांचा भडिमार

तब्बल साडेपाच तास कसून चौकशी : पुन्हा चौकशीला पाचारणाची शक्यता


सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : भोंदू अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास कसून चौकशी केली. ‘एसआयटी’ने त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. चौकशीत समाधानकारक उत्तरे दिल्याचे सांगत, चाकणकर यांनी प्रश्नांबद्दल माहिती देणे मात्र टाळले. दरम्यान, एसआयटीकडून चाकणकर यांना पुन्हा पाचारण केली जाण्याची शक्यता आहे.
भोंदू अशोक खरात याला महिलांवरील अत्याचार, फसवणूक व बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. खरातच्या मीरगाव येथील शिवनिका ट्रस्टवर विश्वस्त असलेल्या चाकणकर यांना ‘एसआयटी’ने रविवारी (ता. ९) चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यानुसार चाकणकर दुपारी साडेबारा वाजता महाराष्ट्र पोलिस अकादमीतील ‘एसआयटी’च्या कार्यालयात चाकणकर महिला वकिलांसह पोहोचल्या. ‘एसआयटी’च्या प्रमुख तेजस्वी सातपुते, सहायक पोलिस आयुक्त अमोल भारती यांनी चाकणकर यांची कसून चौकशी केली. सुमारे पाच ते साडेपाच तासांच्या एसआयटीच्या चौकशीनंतर सायंकाळी त्या पोलिस अकादमीतून बाहेर पडल्या.
....
४५ प्रश्नांचा भडिमार
रूपाली चाकणकर यांची भोंदू अशोक खरात याच्याशी कधी ओळख झाली, शिवनिका संस्थानवर त्यांनी किती वर्षे विश्वस्त म्हणून काम पाहिले, संस्थानच्या आर्थिक व्यवहारांची त्यांना किती माहिती आहे, खरातला भेटण्यासाठी कोण-कोणते राजकीय नेते आले, त्यांनी कोणत्या स्वरूपाच्या पूजाविधी केल्या, चाकणकर यांचे खरात सोबतचे व्हायरल झालेले फोटो-व्हिडिओ कधीचे, त्या करीत असलेल्या पूजाविधी कोणत्या, त्या पूजाविधी कशासाठी केल्या, खरातच्या आर्थिक व्यवहारांची त्यांचा काय संबंध, खरातच्या प्रकरणात चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर केला का, या अन्‌ अशा सुमारे ४५ पेक्षा अधिक प्रश्नांचा भडिमार रूपाली चाकणकर यांच्यावर करण्यात आला.

....


एसआयटी प्रकरणात चौकशीसाठी उपस्थित राहून त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत. पोलिस तपासात संपूर्ण सहकार्य असणार आहे. पुन्हा गरज पडल्यास चौकशीला उपस्थित राहीन. चौकशी अहवालातून काय ते समोर येईलच.
- रूपाली चाकणकर, माजी अध्यक्ष, राज्य महिला आयोग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT