पुणे

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी

CD
टॅलेंट सर्च, द्वारकाई ब्लास्टर्सची विजयी सलामी (उपशीर्षक) जिल्हा टी-२० क्रिकेट स्पर्धा; पंकज महाजन, मनोज पाटील सामनावीर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी आयोजित आणि जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसात टॅलेंट सर्च क्रिकेट क्लब आणि द्वारकाई ब्लास्टर्स स्पोर्ट्स क्लब यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविला. स्‍पर्धेतील पहिल्या सामन्यात टॅलेंट सर्च क्रिकेट क्लबने रंगरेज रॉयल्सचा ८६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत टॅलेंट सर्चने २० षटकांत ५ बाद १५६ धावा उभारल्या. १५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रंगरेज रॉयल्सचा संपूर्ण संघ १९.१ षटकांत केवळ ७० धावांत गारद झाला. उत्कृष्ट फलंदाजीसाठी पंकज महाजन यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. दुसऱ्या सामन्यात द्वारकाई ब्लास्टर्स स्पोर्ट्स क्लबने पाचोरा स्पोर्ट्सवर १३ धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करत द्वारकाई ब्लास्टर्सने २० षटकांत ८ बाद १४० धावा केल्या. प्रत्युत्तरात पाचोरा स्पोर्ट्सला २० षटकांत ८ बाद १२७ धावाच करता आल्या. द्वारकाई ब्लास्टर्सकडून मनोज पाटील (४), तर टिकू राठोड यांनी २ बळी घेतले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या मनोज पाटील यांना सामनावीर पुरस्कार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

First Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? मग हे ‘गोल्डन रूल्स’ नक्की लक्षात ठेवा!

Marathi News Live Updates : पुण्यात उद्या MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चा

Ram Mandir Trust: राम मंदिर ट्रस्टचे महासचिव स्वामी गोविंद देवगिरीजींचा महाराष्ट्र दौरा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन सुरू

SCROLL FOR NEXT