पुणे

दशरथ नगरात वेलींनी वेढलेले विद्युत पोल; डीपीभोवतीही वाढली झाडाझुडपांची समस्या

CD
NSK26H24073 जळगाव : दशरथ नगरात वेलीने वेढलेला वीज खांब. --- NSK26H24074 विघ्नहर्ता चौकाजवळील डीपीला बसलेला वेलींचा वेढा. ---- दशरथ नगरात वेलींनी वेढले विजेचे खांब डीपीभोवतीही झाडाझुडपांची समस्या; वीजप्रवाह उतरण्याचा धोका सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१६ : दशरथ नगर परिसरातील कृष्णा अपार्टमेंटजवळील वीज खांब वेलींनी पूर्णपणे वेढले गेले असून, पावसाळ्यात या ठिकाणी वीजप्रवाह उतरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. परिसरातील वीजखांबांवर वाढलेल्या वेलींमुळे तारांशी संपर्क येण्याची शक्यता असून, पावसाचे पाणी आणि ओलाव्यामुळे धोका आणखी वाढू शकतो. या मार्गावरून नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी वेलींची छाटणी करून विद्युत व्यवस्था सुरक्षित करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, विघ्नहर्ता चौकाजवळील डीपीभोवतीही वेलींनी वेढा घातला आहे. डीपी परिसर मोकळा ठेवणे आवश्यक असताना येथे वाढलेल्या झाडाझुडपांमुळे देखभालीत अडथळे येत आहेत. चौकट तातडीने उपाययोजनेची गरज उघड्या आणि असुरक्षित विद्युत यंत्रणेमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. शहरातील अशा धोकादायक ठिकाणांची पाहणी करून वीज वितरण कंपनी आणि संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दशरथ नगर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT