पुणे

ढोल-ढोल-ताशांच्या गजरात बालगृहातीलताशांच्या गजरात बालगृहातील

CD
NSK26H24076 जळगाव : बालनिरीक्षणगृहात येथे ढोल-ताशा व ध्वज पथकाचे वाद्यपूजन करताना मान्यवर. ------ ढोलपथक निर्मितीतून बालगृहातील मुलांच्या कलागुणांना नवी दिशा वाद्यपूजनाने सरावास उत्साहात प्रारंभ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१६ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुला-मुलींच्या बालनिरीक्षणगृहात ढोल-ताशा पथकासह ध्वज पथकाच्या वाद्यपूजनाचा कार्यक्रम झाला. या उपक्रमामुळे बालगृहातील मुला-मुलींना कला व संस्कृतीची ओळख होण्याबरोबरच त्यांच्या मानसिक विकासाला सकारात्मक चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बालगृह अधीक्षक रविकिरण अहिरराव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. बालकांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि सकारात्मकता निर्माण व्हावी या उद्देशाने शिवशक्ती ढोल-ताशा व ध्वज पथकाची स्थापना करण्यात आली आहे. वाद्यपूजनानंतर बालगृहातील मुला-मुलींनी ढोल-ताशा वादनाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा मयुरा निंबाळकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, परिविक्षा अधिकारी महेंद्र पाटील, हरित सेना प्रमुख प्रवीण पाटील, शिवगंध ढोल-ताशा पथकाचे स्वप्नील शेटे व दीपक सोनार यांच्यासह बालगृहातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bandh: देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन! आज महाराष्ट्र बंद, कोणत्या सुविधा चालू तर कोणत्या बंद? जाणून घ्या...

RadhaKrishna Irrigation Project : कृष्णा नदीच्या पाण्यावरून वाद पेटला! कोल्हापुरातील प्रस्तावित धरणाला कर्नाटकचा तीव्र विरोध; कन्नड संघटनांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

Instagram New Feature : इंस्टाग्रामवर पोस्ट डिलीट न करता बदला गाणं; Replace Audio फीचर लॉन्च, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

IND vs ZIM Pitch Report: हरारेची खेळपट्टी आज नेमकी कशी खेळणार? फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? सामना FREE कुठे पाहणार?

SCROLL FOR NEXT