वीज महावितरण कंपनीची
भुसावळात धडक कारवाई
भुसावळ, ता. १६ : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण)च्या पथकाने भुसावळातील जल शुद्धीकरण केंद्र व पालिका अग्निशमन विभागात अनधिकृत वीज वापर होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत धडक कारवाई केली. कार्यकारी अभियंता रमण दातूनवाला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासणीत सुमारे अंदाजे २०० किलोवॅट क्षमतेचा अनधिकृत वीज वापर होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सर्व्हिस रोडलगत असलेल्या ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर परिसरातील विजेच्या खांबावरून जलशुद्धीकरण केंद्र व अग्निशमन विभागासाठी अनधिकृत वीजजोडणी करण्यात आल्याचे तपासात आढळले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अनधिकृत वीजवापरास जबाबदार असलेल्या संबंधितांवर वीज कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रमण दातूनवाला यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.