पुणे

महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसेचा इशारा

CD
३६-२ पिंपरी रौळस परिसरामध्ये महावितरणची अनागोंदी -------- वीजकपात न थांबल्यास आंदोलनाचा मनसेचा इशारा सकाळ वृत्तसेवा कुंदेवाडी, ता. १६ : पिंपरी रौळस (ता. निफाड) परिसरात महावितरणकडून सुरू असलेल्या वारंवारच्या वीजकपातीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि ग्रामीण भागातील ग्राहक त्रस्त झाले आहेत. या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. २४ तासांपैकी तब्बल साडेपाच तास लोडशेडिंग होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप मनसेचे सहकार विभागाचे नाशिक जिल्हाध्यक्ष तुषार गांगुर्डे यांनी केला आहे. श्री. गांगुर्डे म्हणाले, सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असल्याने बहुतांश शेतकरी सिंचनासाठी शेतपंप वापरत नाहीत. केवळ घरगुती वापरासाठी पाणी भरण्यापुरतेच पंप सुरू केले जात आहेत. त्यामुळे विजेवरील अतिरिक्त भार असल्याचे कारण महावितरणकडून देता येणार नाही. अशा परिस्थितीत कोणतेही ठोस कारण नसताना नागरिकांवर लादली जाणारी लोडशेडिंग ही अन्यायकारक असून, महावितरणने याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘राज्यात विजेचा तुटवडा नसल्याचा दावा केला जात असताना ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग का केले जात आहे? महाराष्ट्रातील ग्राहकांना अंधारात ठेवून इतर राज्यांना, विशेषतः गुजरातला, अखंडित वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न होत आहे का? या सर्व बाबींवर महावितरणने नागरिकांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी भूमिका गांगुर्डे यांच्यासह शेतकऱ्यांनी मांडली आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

CJP Protest : आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर; शरद  पवार, अरविंद केजरीवाल यांची उपस्थिती

CJP Protest: उद्धव ठाकरेंचा दिल्लीतून सत्ताबदलाचा नारा! 'सीजेपी'च्या आंदोलनाला दिली भेट, दीपकेंचं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT