पुणे

अवतीभवती

CD
अवतीभवती -- कालिदास दिन ‘सावाना’त उत्साहात नाशिक : सार्वजनिक वाचनालयात बुधवारी (ता. १५) महाकवी कालिदास दिन साजरा करण्यात आला. या वेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे, प्रमुख सचिव गिरीश नातू, बालविभाग प्रमुख सुरेश गायधनी, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी उपस्थित होते. या वेळी कालिदासांच्या साहित्याचा अभ्यास व वाचनाची परंपरा अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. सुरवातीला ज्येष्ठ सभासद चारुदत्त दीक्षित यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. --------- विनामूल्य आरोग्य तपासणी शनिवारी नाशिक : ज्येष्ठ समाजसेवक शंकरराव बर्वे व मातोश्री नर्मदाबाई बर्वे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त तसेच हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रविवारी (ता. १९) विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळ आणि गजानन मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर होणार आहे. शिबीरात रक्तदाब, साखर तपासणी व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार इसीजी, नेत्र तपासणी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिर सकाळी दहा ते दुपारी दोनदरम्यान नेहरू चौकातील, सोमवार पेठ सोनारवाडा येथे होणार आहे. ----- मेळाव्यासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन नाशिक : सार्वजनिक वाचनालयाचा १७ व १८ ऑक्टोबरला ५७वा जिल्हा साहित्यिक मेळावा होणार आहे. मेळाव्यात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये कवी गोविंद काव्य स्पर्धा, डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धा, चंद्रकांत महामिने पुरस्कृत विनोदी कथा स्पर्धा, जयश्री पाठक कविता संग्रह पुरस्कार, मधुवंती अशोक केंघे कथा आणि कविता संग्रह पुरस्कार अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा साहित्यिक मेळाव्यात करण्यात येणार आहे. इच्छुकांनी कविता, कथा, कविता संग्रह व कथा संग्रह प्रमुख सचिव, सार्वजनिक वाचनालय, टिळक पथ, नाशिक ४२२००१ या पत्त्यावर ६ ऑगस्टपर्यंत पाठवाव्यात. ------- आत्मशोध पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन नाशिक : गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित योगाचार्य अशोक पाटील यांनी लिहिलेल्या ‘आत्मशोध’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. १८) गंजमाळ येथील रोटरी हेल्थ सोसायटी येथे सायंकाळी साडेपाचला होणार आहे. प्रकाशन महामंडलेश्वर शिवानंद महाराज यांच्या हस्ते, तर अध्यक्षस्थानी सावळीराम तिदमे यांच्यासह ॲड. भगीरथ शिंदे, नानासाहेब बोरस्ते, प्रज्ञा पाटील, सुरेश पवार उपस्थित राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi : राहुल गांधी छत्रसाल स्टेडियममध्ये, कार्यकर्ते आक्रमक

IND vs ZIM: झिम्बाब्वेत वैभव सूर्यवंशीची खरी परीक्षा! पहिला सामना कधी, किती वाजता; संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

राहुल गांधींच्या नाकातून रक्तस्त्राव! ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून मारहाण? काँग्रेसची अधिकृत पोस्ट

Manchar News : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुणे जिल्ह्याची दुहेरी बाजी; काळवाडी प्रथम, कडाचीवाडीला पाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात; चर्चेत काय घडलं? सरकारकडून आंदोलकांवर शब्द फिरवल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT