पुणे

ट्रॅक्टर हाऊस परिसरात ट्रान्सफॉर्मरला आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

CD
फोटो : A14170 नाशिक : ट्रॅक्टर हाऊस परिसरात ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग -- शॉर्टसर्किटमुळे ट्रान्सफॉर्मर पेटला अग्निशमन जवानांमुळे मोठी दुर्घटना टळली सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. १६ : ट्रॅक्टर हाऊस परिसरातील ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले व पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणली. अग्निशमन मुख्यालयात ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याची माहिती प्राप्त झाली. माहिती मिळताच पथकप्रमुख किशोर पाटील, लीडिंग फायरमन इसाक शेख, फायरमन महेश कदम, स्वप्निल नांदे, साकेत भवर, अभिषेक बैरागी यांचे अग्निशमन पथक अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. ट्रान्सफॉर्मरला चारही बाजूंनी आग लागल्याचे निदर्शनास आले. प्रथम वीजपुरवठा खंडित करून न पाण्याचा मारा आणि कुलिंग करत आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन विभागाच्या तत्परतेने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परिसरात माहिती मिळताच बघ्यांची गर्दी झाली होती. आगीने रुौद्ररूप धारण केले असल्याने ऑइल मोठ्या प्रमाणावर उकळत होते. दूरपर्यंत ऑइल उकळण्याचा आवाज येत होता. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होतो की काय अशी भीती निर्माण होती. त्यामुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांनादेखील अतिशय सावधानपूर्वक पाण्याचा मारा करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT