ओतूर, ता. ८ : स्वतःच्या नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास जुन्नर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी.
जुन्नर तालुक्यात १९ डिसेंबर २०२० रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. पीडित मुलगी शाळेच्या सुट्टीत जेवणासाठी घरी आली असता, आरोपीने घराचा दरवाजा आतून बंद करून तिला मारहाण केली व अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या आईने ओतूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक पी. एच. कांबळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
विशेष न्यायाधीश एस. बी. शेलार यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. जी. के. खोडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्याच्या कलम ४ (२) अंतर्गत जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड, तसेच भादंवि कलम ३२३ अंतर्गत एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावणी. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची तरतूदही निकालात केली आहे.
ओतूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, कोर्ट पैरवी अधिकारी मनीषा ताम्हाणे, महिला कर्मचारी पूजा औटी यांनी काम केले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलिस हवालदार देविदास खेडकर यांनी केला. अतीरिक्त सरकारी वकील म्हणून जी. के. खोडे यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.