फोटो ३ कॉ फक्त
OZM26B14213
ओझर ः महावितरणच्या येथील उपविभागाच्या सहायक अभियंत्यांना निवेदन देताना दिक्षीचे ग्रामस्थ
--------------
बातमी फक्त २ कॉलम
३०-२
रात्री भारनियमन बंद करा,
स्मार्टमीटर सक्ती थांबवा
दिक्षी ग्रामस्थांचा इशारा ः आंदोलनाचा इशारा
-----------
ओझर, ता. १६ ः दिक्षी येथील ग्रामस्थांनी दिक्षी परिसरात वाढत्या वीज समस्यांबाबत महावितरणच्या ओझर उपविभागाच्या सहायक अभियंत्यांना निवेदन सादर करून विविध मागण्या केल्या आहेत. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, रात्रीचे भारनियमन, वीज बिघाड दुरुस्त होण्यास होणारा विलंब तसेच स्मार्ट मीटरच्या सक्तीबाबत कर्मचारी अरेरावी अशा विविध विषयावर नाराजी व्यक्त करत समस्या न सुटल्यास दीक्षी उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशाराह ग्रामस्थांनी दिला आहे.
-----------
निवेदनात म्हटले आहे, की रात्रीचे भारनियमन तात्काळ बंद करावे. रात्री- आपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे दिवसभरात शेतात काम करून दमलेल्या शेतकरी व शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. शिवारात वास्तव्यास असलेले शेतकऱ्यांना बिबट्यासारख्या प्राण्याचा धोका निर्माण होतो. अत्यावश्यक असल्यास दिवसा नियोजनबद्ध पद्धतीने भारनियमन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. भारनियमनाचे वेळापत्रक आगाऊ जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचीही मागणी करण्यात आली. दिक्षी गावात कुठलाही वायरमन हे त्याच्या कार्यक्षेत्राच्या मुख्यालयी वास्तव्यास राहत नाही. स्मार्ट मीटर बसविण्याबाबतही अनेक ग्राहकांनी शंका आणि हरकती व्यक्त केल्याने ही योजना सक्तीची न ठेवता ऐच्छिक करावी व ग्राहकाची लेखी संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सरपंच डॉ. योगेश्वर चौधरी, विनायक चौधरी. अभिजित चौधरी, सचिन चौधरी आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
-------------
१६-१
वायरमनने खिडकीतून ठोकली धूम
दिक्षी ग्रामस्थ विजेसंदर्भात निवेदन घेऊन दिक्षी उपकेंद्राला गेले असता सहाय्यक अभियंता सुवर्णा मोरे या कार्यालयात नसल्याने वायरमन नितीन थेटे यांच्याकडे निवेदन द्यावे म्हणून शेतकऱ्यांनी आवाज दिला असता वायरमनने हळूच पाठीमागच्या बाजूने खिडकीतून शिवारात पलायन केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी दर्शवली.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.